Nashik News : नातेवाईक नव्हे कॅशिअरसाठी दरपत्रक! रुग्णालये प्रशासनाचा प्रकार, शहरातील रुग्णालयांना नोटीस

Nashik News : राज्य शासनाच्या सूचनेनुसार रुग्णालयांना दर पत्रक व सनद दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे.
hospitals
hospitalsesakal

Nashik News : राज्य शासनाच्या सूचनेनुसार रुग्णालयांना दर पत्रक व सनद दर्शनी भागावर लावणे बंधनकारक आहे. परंतु जवळपास सर्वच रुग्णालय प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने वैद्यकीय विभागाने रुग्णालयांची तपासणी सुरु केली. पहिल्या टप्प्यात वीस रुग्णालयांची तपासणी केली. त्यात रुग्णांच्या नातेवाईक यांच्याऐवजी कॅशिअरला दिसेल असेच दरपत्रक लावण्यात आल्याचे आढळून आल्याने या रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Nashik Tariff for cashier not relatives incident Hospital Administration Notice to City Hospitals) (latest marathi news)

कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. बेड मिळत नसल्याने मिळेल त्या जागेवर उपचार सुरू होते. एकीकडे उपचार होत असताना दुसरीकडे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक लुट होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या. रुग्णालयाचे बिल भरताना नातेवाइकांच्या नाकीनऊ आले. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर राज्य शासनाने राज्यभरात रुग्णालयांना दरपत्रक दर्शनी भागावर लावण्याच्या सूचना दिल्या. कोविड काळात शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली.

कोविड नंतरच्या काळात नागरिक जसे सामाजिक अंतर पाळणे विसरले. त्याचप्रमाणे रुग्णालयांची देखील दर्शनी भागावर दरपत्रक लावण्याचा नियम पायदळी तुडवला. दरम्यान नागरिकांच्या अद्यापही तक्रारींचा ओघ सुरु असल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने तीन वेळेस दर्शनी भागावर दरपत्रक लावण्याची नोटीस बजावली.

मात्र त्यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी वैद्यकीय विभागास मिळाल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मनपा वैद्यकीय विभागाने आठ एप्रिल पासून नऊ निकषांच्या आधारे खासगी रुग्णालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. नऊ निकष न पाळणाऱ्या रुग्णालयांना नोटीस दिली जाणार आहे. त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.

येथे करता येणार तक्रार

महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टनुसार रुग्णहक्क दर पत्रक न लावणाऱ्या खासगी रुग्णालय विरोधात तक्रार करण्यासाठी १८००२३४२४९ या टोल फ्री क्रमांकवर तक्रार करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले.  (latest marathi news)

hospitals
Chhagan Bhujbal : नाशिकमधून छगन भुजबळ यांची माघार; पत्रकार परिषद घेत सांगितलं कारण

"वीस खासगी रुग्णालयांची पहिल्या टप्प्यात तपासणी झाली. त्यात कॅशिअरला दिसेल अशा पद्धतीने दरपत्रक लावण्याचे आल्याचे दिसून आले. वास्तविक रुग्णांच्या नातेवाइकासाठी दरपत्रक व सनद लावण्याच्या सूचना असताना त्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आली."-डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक

या कागदपत्रांची होणार तपासणी

- रुग्ण हक्क सनद.

- रुग्ण उपचार दर पत्रक.

- नगर रचना विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र.

- जैविक घनकचरा विल्हेवाट प्रमाणपत्राचे ना हरकत दाखला.

- अग्निशमन ना हरकत दाखला व फायर ऑडिट.

- महापालिकेचे घरपट्टी व पाणीपट्टी भरल्याचा दाखला.

- प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा ना हरकत दाखला.

- इलेक्ट्रिकल ऑडिट.

- रुग्णालयातील डॉक्टर व नर्सेसची संख्या.

hospitals
Sharad Pawar : सत्ता त्यांची अन् हिशोब मला मागतात ,शरद पवार ; सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला शुभारंभ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com