Nashik: तहानलेल्यांची तृष्णा भागते ताज्या रसाने! गडावरील पदयात्रेकरूंसाठी धुळ्याच्या महाले प्रतिष्ठानचा भेंडी येथे उपक्रम

Nashik News : आदिमाया देवी सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी खानदेशातील भाविक नांदुरी गडाकडे मार्गक्रमण करत आहेत
Volunteers of Mahale Pratishthan of Dhule serving fresh sugarcane juice to devotees passing from Bhendi Chauphuli
Volunteers of Mahale Pratishthan of Dhule serving fresh sugarcane juice to devotees passing from Bhendi Chauphuli esakal

देवळा : आदिमाया देवी सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी खानदेशातील भाविक नांदुरी गडाकडे मार्गक्रमण करत आहेत. या पायी चालणाऱ्या व थकलेल्या भक्तांची तहान भागविण्यासाठी भेंडी (ता. कळवण) येथील चौफुलीवर धुळे येथील महाले प्रतिष्ठानतर्फे मोफत उसाचा रस दिला जात आहे.

साधारणतः एक ते दीड लाख भाविकांना पोटभर रस दिला जातो, हे कार्य गेल्या १६ वर्षांपासून अव्याहतपणे चालू असल्याचे या प्रतिष्ठानचे सतीशतात्या महाले यांनी 'सकाळ' ला सांगितले. (Nashik Thirsty quench thirst with fresh juice Dhule Mahale Pratishthan activities at Bhendi for saptashrungi gad pilgrims marathi news)

प्रचंड उष्मा व रणरणते ऊन डोक्यावर घेत हे भाविक पदयात्रेने मार्गस्थ होत आहेत. यातील प्रमुख मार्ग म्हणजे ठेंगोडा- लोहोणेर- वसाका- विठेवाडी व मधल्या मार्गाने कळवण आणि तेथून पुढे नांदुरी असा आहे. या रस्त्याने जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या मार्गावर त्यांना थोडी विश्रांती मिळावी म्हणून या चौफुलीवर मंडप टाकून सावलीची सोय केली आहे. त्यांची तहान भागावी म्हणून उसाचा रस मोफत आणि तोही अनलिमिटेड वाटप केला जातो.

श्री. महाले म्हणाले, ८० ते ९० टन ऊस आणून मोठ्या दोन व लहान पाच अशा सात चरक मशिनच्या साहाय्याने ताजा रस काढून तो भाविकांना दिला जातो. यासाठी ८५ व ६५ केव्हीचे दोन जनरेटर येथे कार्यान्वित केले आहेत. यासाठी जवळपास २०० -२५० स्वयंसेवक मदतीला असतात. आजपासून यात्रेला वेग आला असून भाविकांची संख्या वाढू लागली आहे. पुढील दोन ते तीन दिवस आमच्या दृष्टीने धामधुमीचे असतील. जास्तीत जास्त भाविकांना रस पाजण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.  (latest marathi news)

Volunteers of Mahale Pratishthan of Dhule serving fresh sugarcane juice to devotees passing from Bhendi Chauphuli
Nagpur Lok Sabha Election : नागपूरमध्ये मतदान का कमी झालं? PM मोदींचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सवाल

"पायी चालणाऱ्या भाविकांचा श्रमपरिहार व्हावा त्यांना ऊर्जा मिळावी म्हणून कुणी अन्नदान करतात तर कुणी पाणी पाजतात. यात आपलाही सहभाग असावा व भाविकांना चालण्यास बळ मिळावे, तहान भागावी या उद्देशाने आपण हा उपक्रम चालू केला आहे. भाविकांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच प्रसाद मानून हे कार्य करत आहे."- सतीश महाले, अध्यक्ष, महाले प्रतिष्ठान

"थंडगार पाणी आणि उसाचा रस यामुळे क्षुधा शांत होते तर सावलीमुळे आणि संगीत गाणी यांमुळे मनाला शांती मिळते. दरवर्षी आम्ही येथे थांबतोच."

- भास्कर रौदळ. भाविक.

मोबाईल चार्जिंगची सोयही

एका बाजूला भाविकांची तहान भागविली जात असताना पायी चालणाऱ्या भाविकांचे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी येथे जवळपास २५० ते ३०० चार्जिंग पॉईंटची सोय येथे करण्यात आली आहे. यामुळे आराम, थोडी पेटपूजा आणि मोबाईल चार्जिंग असे तिहेरी हेतू येथे साध्य होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी येथे दिसून येते. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केले जात आहेत.

Volunteers of Mahale Pratishthan of Dhule serving fresh sugarcane juice to devotees passing from Bhendi Chauphuli
Nashik News : यात्रेकरूंसाठी दानशूरांचा सेवायज्ञ! मालेगावात लोकवर्गणी काढत मेडीकल असोसिएशनतर्फे 2 दशकांची सेवा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com