Nashik Grapes : द्राक्ष हंगामात यंदा ‘पेड कटिंग’चा फंडा; रोकडबरोबरच द्राक्षमालाची हेळसांड कमी

Nashik Grapes : पूर्वी द्राक्षांचा सौदा करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची विनतवारी करावी लारावी लागायची आणि त्या द्राक्षमालाची रक्कम मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांपुढे लोटांगणच घालावे लागायचे.
grapes
grapesesakal

Nashik Grapes : पूर्वी द्राक्षांचा सौदा करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची विनतवारी करावी लारावी लागायची आणि त्या द्राक्षमालाची रक्कम मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांपुढे लोटांगणच घालावे लागायचे. यंदा ‘पेड कटिंग’ ही द्राक्ष खरेदी-विक्रीची नवी पद्धत मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात रूजली आहे. त्यामुळे रोकडबरोबरच द्राक्षमालाची हेळसांड कमी झाली, असा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना झाला. पेड कटिंगमुळे मोठ्या प्रमाणात निकास होऊन द्राक्ष हंगाम यंदा १५ दिवस अगोदर संपण्याची चिन्हे आहेत. (nashik This year Ped Cutting new method of buying and selling grapes marathi news)

रोकडा व्यवहार

शेतकऱ्यांना सरासरीपेक्षा दोन रुपये किलो अधिकचा दर देऊन परप्रांतीय व्यापारी ठकबाजी करायचे. खोटे धनादेश देऊन धूम ठोकायचे. यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना नाडले गेले. मागील वर्षापासून यावर उपाय, म्हणून काही प्रामाणिक व्यापारी व अधिकच लोभ न ठेवता शेतकऱ्यांनी पेड कटिंगचा व्यवहार केला. वेलीवरील तोडलेला द्राक्ष घडाची नाममात्र विरळणी करून थेट बॉक्समध्ये भरले जाते.

वजन करून ते बाॅक्स थेट परराज्यात विक्रीसाठी पाठविले जातात. यामुळे शेतकऱ्यांची द्राक्ष काढणीची मजुरीची बचत होते. शिवाय फारशी हातळणी होत नसल्याने मणी गळ होत नसल्याने वजनही अधिक भरते. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष काढणी झाले, की ठरलेल्या सौद्यानुसार रोकडा व्यवहार पूर्ण केला जातो. सहा दिवस चालणारी द्राक्षांची काढणी दोन दिवसांत पूर्ण होत आहे.

रोख रक्कम मिळत असल्याने शेतकरी दोन रुपये कमी, पण पेड कटिंगच्या व्यवहाराला प्राधान्य देत आहेत. नाशिक जिल्ह्यात यंदा सुमारे २५ टक्के व्यवहार पेड कटिंग प्रमाणे झाले. यंदा व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे प्रकार फारसे झाले नाहीत. द्राक्षबागा मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बागांमध्ये घिरटया घालण्याची वेळ आली. स्पर्धेमुळे देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेसाठी द्राक्षांना ४० ते ४५ रुपये किलोचा भाव मिळत आहे. (latest marathi news)

grapes
Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांची नेदरलॅंड, रोमोनियात निर्यात; 980 टन द्राक्ष रवाना

मागील पाच वर्षांत तो कधी मिळालेला नाही. पेड कटिंगमुळे बागांमधील काढणी लवकर झाली. यंदा हंगामाचा पडदा दोन आठवडे अगोदर खाली पडणार असल्याचे दिसत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातून शंभर ट्रकांमधून अडीशे टन द्राक्ष परराज्यात पोचत आहे.

द्राक्ष मणी २५ रुपये किलो

द्राक्षघड काढणीनंतर मजुरांकडून त्या घडातील कमकुवत व कमी दर्जाचे मणी काढून टाकले जायचे. ते मणी नंतर बेदाणा उत्पादकांना निम्या दराने विक्री केले जायचे. पेड कटिंगमुळे द्राक्षमणी गळ अत्यल्प आहे. द्राक्ष मण्याची आवक होत नाही.

''बेदाणा उत्पादकांना द्राक्ष मणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे लागत आहे. तुटवडा झाल्याने २५ रुपये प्रतिकिलो दर द्राक्षमण्यांना मिळत आहे. गेल्या २० वर्षांतील सर्वकालीन उंच्चाकी दर आहे. मण्याचे दर वधारल्याने बेदाण्याचे दरही दुप्पट होतील. पेड कटिंगमुळे द्राक्षांची हाताळणी कमी होत असल्याने दर्जा टिकतो. त्यामुळे आम्ही परराज्यात पाठविलेल्या द्राक्षाला चांगला दर मिळत आहे. पेड कटिंगची पद्धत यंदा अधिक प्रमाणात रूजल्याने हंगाम लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.''-संतोष निकम, द्राक्ष व्यापारी

''अधिकच्या दराचा लोभ दाखवून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट व्हायची. पेड कटिंगमुळे ठकबाज व्यापाऱ्यांना चाप बसला असून, रोख पेमेंट मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी ही पद्धत फायदेशीर आहे.''-साहेबराव देशमाने, द्राक्ष उत्पादक

grapes
Nashik Grapes Crisis: 20 लाखांचे कर्ज फेडायचे कसे? नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचा सवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com