Saptashrungi Devi Temple : खानदेशातून उसळला जनसागर; भगवतीच्या दर्शनाची आस बाळगत आबालवृद्ध सप्तशृंगगडाकडे

Saptashrungi Devi : आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी रणरणते ऊन अंगावर झेलत खानदेशातील हजारो भाविक गडाकडे मार्गस्थ होत आहेत.
Devotees going to Saptshringagad
Devotees going to Saptshringagadesakal

Saptashrungi Devi Temple : आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी रणरणते ऊन अंगावर झेलत खानदेशातील हजारो भाविक गडाकडे मार्गस्थ होत आहेत. आबालवृद्धांसह महिला, तरुण, तरुणी अशा सर्व घटकातील श्रध्दाळूंचा यात समावेश आहे. विशेषतः: दुष्काळी परिस्थिती असतानाही श्रध्दा सर्वश्रेष्ठ ठरली आहे. धुळे ते मालेगाव महामार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. नांदुरीकडे जाणारे रस्ते माणसांच्या गर्दीने वाहत असून जय अंबेचा जयघोष अहोरात्र दुमदुमत आहेत. (nashik Thousands of devotees from Khandesh are making their way to saptashrungi temple marathi news)

दरम्यान आतापर्यंत मालेगावमार्गे तीन लाखावर श्रद्धाळू गडाकडे रवाना झाले. चैत्रोत्सवासाठी खानदेशातून दरवर्षी लाखो भाविक पायी यात्रेने गडावर जातात. यात महिला व तरुणांचा समावेश अधिक आहे. संपूर्ण खानदेशात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाचा परिणाम यात्रेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दोन दिवसापासून खानदेशातील हजारो भाविकांचे पाय गडाच्या दिशेने चालत आहेत.

नांदुरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर श्रध्दाळूंच्या गर्दीमुळे पाय ठेवायलाही जागा नाही. गेल्या तीन दिवसांपासून मालेगाव व परिसराचा पारा ४३ अंशावर आहे, उन्हाची तमा न बाळगता सप्तशृंगीचा जयजयकार करत खानदेशच्या कानाकोपऱ्यातील भाविक डफ व डीजेच्या तालावर नाचत मार्गस्थ होत आहेत. शिरपूर येथील आबा चौधरी यांचा रथ सायंकाळी पाचला चाळीसगाव फाट्यावर आला. दरेगावपासून नवीन बसस्थानकापर्यंत पोलिसांनी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे लावले होते. रस्त्यावरील दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले होते.  (latest marathi news)

Devotees going to Saptshringagad
Saptashrungi Devi Temple: सप्तशृंगी गडावरून मशाली प्रज्वलीत करून मंडळे रवाना; उद्यापासून नवरात्रोत्सव

रथाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जाफरनगर भागात अन्वर अश्रफी, शेख अकबर, मौलाना अब्दुल रहेमान, मौलाना फजलूर रहेमान, डॉ. एकलाख अन्सारी, सुफी जमील अन्सारी, मोहम्मद साबीर आदींनी स्वागत केले. शिवतिर्थावर श्री. चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या ठिकाणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, भरत पाटील, निखिल पवार, कैलास शर्मा, जितेंद्र देसले, संदीप अभोणकर, प्रेम पाटील आदींनी रथाचे स्वागत केले. दरेगाव ते मोसम चौकापर्यंत ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिरपूर रथ सातलाच शिवतिर्थावर

रथमार्गावरील दुतर्फा असलेली दुकाने बंद करण्यात आली होती. मोसम पुलाकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी अन्यत्र वळविण्यात आली होती. पायी यात्रेकरूंचा मार्ग व मोसम चौकाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरेकेटींग लावण्यात आल्या होत्या. अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक तेजबीरसिंह संधू आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी बंदोबस्तात कार्यरत होते.

सलग दोन वर्ष शिरपूरचा रथ रात्री अकरानंतरच मोसम चौकात येत होता. यावर्षी पोलिसांनी विशेष काळजी घेतल्याने रथ सायंकाळी साडेसहापर्यंत शिवतिर्थावर तर सातला मोसम चौकात पोहोचला होता. मोसम चौकात सप्तशृंगीचा जयघोष करत यात्रेकरूंनी डीजेच्या तालावर नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. रथ सुरळीतपणे मार्गस्थ झाल्याने पोलिस प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

Devotees going to Saptshringagad
Saptashrungi Devi Temple : सप्तशृंगीदेवीचे 20 हजार भाविकांनी घेतले दर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com