Nashik News : पैशांसाठीच्या छळाला कंटाळून 2 चिमुरड्यांसह उचलले टोकाचे पाऊल

Nashik : विवाहितेने दोन चिमुरड्यांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
dead
deadesakal

Nashik News : माहेरून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून खतवड (ता. दिंडोरी) येथील विवाहितेने दोन चिमुरड्यांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी पूरकर (वय ३०, रा. धोंडगव्हाण वाडी, ता. चांदवड) यांचा विवाह अर्जुन सुदाम मुळाणे (वय ३५, रा. खतवड, ता. दिंडोरी) यांच्याशी १६ मे २०१२ ला झाला. (Tired of being harassed for money extreme step taken with 2 kids)

उभयतांनी तीन वर्षे अश्विनीला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. याबाबत तिने माहेरच्यांनाही माहिती दिली. मात्र त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूलही केले. २०१८ मध्ये अश्विनीला सासू, नवरा व दीराने शिवीगाळ व मारहाण केली. अश्विनीने माहेरच्यांना ही माहिती दिली.

नाइलाजाने अश्विनीच्या वडिलांनी पाच लाख रुपये रोख अश्विनीच्या सासरच्यांना दिले. काही दिवस सारे काही ठीक चालले. पुन्हा अश्विनीला त्रास देऊन पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी त्रास देणे सुरू झाले. अश्विनीच्या वडिलांनी पुन्हा तीन लाखांची तजवीज केली. तेव्हा पाच लाख रुपये मागितले, पण तुझ्या वडिलांनी तीनच दिले, असे सांगत तिचा पुन्हा छळ सुरू झाला.

dead
Nashik News : सीएसआर फंडातून जि. प. आरोग्याला 3 रुग्णवाहिका

अश्विनी व तिच्या पतीने वाद नको म्हणून पिंपळगाव बसवंत येथे तीन महिने वेगळे ठेवले. मात्र अश्विनीचे मन वळवून पुन्हा खतवडला आणले व पुन्हा त्रास देऊन पैशांची मागणी केली. हा प्रकार सुरूच राहिल्याने अश्विनी हतबल व अस्वस्थ झाली. अखेर तिने शुक्रवारी (ता. २६) मुलगा सिद्धेश (वय ९) व विराज (वय ६) या दोघांसमवेत राहत्या घराच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपविली.

अश्विनीचे वडील चंद्रकांत नारायण पूरकर यांच्या फिर्यादीनंतर पती अर्जुन सुदाम मुळाणे, सासू हिराबाई सुदाम मुळाणे, दीर प्रमोद सुदाम मुळाणे या तिघांविरोधात पैशांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांनी दाखल केला आहे. तिघांना ताब्यात घेतले असून, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास लौढे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव वडजे, प्रदीप शिंदे, पोलिस नाईक कडाळे, पानसरे तपास करीत आहेत.

dead
Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com