Nashik News : ऑनलाईन क्लास युवतीला पडला महाग; कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत अत्याचार

Nashik : ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून ओळख झालेल्या संशयिताने म्हसरूळमधील युवतीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.
crime
crimeesakal

Nashik News : ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून ओळख झालेल्या संशयिताने म्हसरूळमधील युवतीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. याचे व्हिडिओ व फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयिताविरोधात म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (nashik Torture by giving drugs from cold drink marathi news)

विवेक योगनारायण बोहरा (रा. गीता भवनजवळ, जैतारण, जि. ब्येवार, राजस्थान) असे संशयिताचे नाव आहे. म्हसरुळ परिसरातील पीडित युवती शिक्षण घेते. त्यासाठी तिने ऑनलाइन क्लास जॉईन केला होता. व्हाटस्अॅपच्या माध्यमातून क्लास सुरु असताना संशयित विवेक याने शिक्षणासह अन्य अवांतर बोलणे सुरु केल्यामुळे दोघांत मैत्री वाढत गेली.

संशयिताने तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संशयित विवेक पीडितेला भेटण्यासाठी राजस्थानवरुन नाशिकला आला. दोघे वेगवेगळ्या कालावधीत संशयित हा पिडितेसोबत मुंबई, सोमेश्वर, पुणे, गुजरात आदी ठिकाणी फिरायला गेले. यानंतर नाशिकमध्ये परत आले असता, संशयित विवेकने पीडितेच्या घरात असताना कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून तिला पाजले.

crime
Nashik Crime News : कलानगरला बंगल्यातून 6 लाखाचा गुटखा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा

काही मिनिटांत ती बेशुद्ध झाली. त्याचा गैरफायदा घेत विवेकने तिच्यावर अत्याचार करीत अश्लील व्हिडिओ व फोटो त्याने काढले. त्यानंतर तो परत निघून गेला. मात्र, काही तासांनी विवेकने पीडितेचे अश्लील व्हिडिओ व्हाट्सअपवर टाकून व्हायरल करण्याची धमकी दिली.

याप्रकरणी संशयिताविरोधात म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयिताच्या मोबाईल लोकेशन व अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे म्हसरुळ तपास सुरु केला आहे. यातील संशयित मनोज हा उच्चशिक्षित असून त्याच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली.

crime
Nashik News : जुने शौचालय दुरुस्त होत नाही, नवीन बांधले जात नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com