Nashik News : पर्यटनाला आला बहर! रामतीर्थावर वाढली वर्दळ, स्‍थानिकांसह पर्यटकांची हजेरी

Nashik : स्‍थानिक नागरिकांसह विविध शहर, परराज्‍यातून भाविक हजेरी लावत असल्‍याने पर्यटनाला बहर आल्‍याचे बघायला मिळत आहे.
Nashik News : पर्यटनाला आला बहर! रामतीर्थावर वाढली वर्दळ, स्‍थानिकांसह पर्यटकांची हजेरी

Nashik News : गेल्‍या काही दिवसांपासून रामतीर्थ परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. स्‍थानिक नागरिकांसह विविध शहर, परराज्‍यातून भाविक हजेरी लावत असल्‍याने पर्यटनाला बहर आल्‍याचे बघायला मिळत आहे. रविवारी (ता.२१) सुट्टीनिमित्त परिसरात चांगली गर्दी झाली होती. धार्मिक विधी किंवा पर्यटन, तीर्थाटन आदी विविध कारणांनी रामतीर्थावर बाराही महिने भाविकांची उपस्‍थिती असते. परंतु उन्‍हाळी सुट्यांनिमित्त येथील गर्दी उच्चांक गाठला जातो. (nashik Tourist crowd has increased in Ramtirtha area since few days due to summer holiday)

त्‍यानुसार काही दिवसांपासून येथे पर्यटकांची संख्या वाढती आहे. रामतीर्थासमवेत काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्‍वर मंदिरासह परिसरातील अन्‍य मंदिरांमध्ये भाविकांच्‍या दिवसभर रांगा लागल्‍याचे चित्र दिसून येत आहे. तर रामतीर्थावर बच्चे कंपनी सूर मारत मनमुराद आनंद लुटतांनाचे विलोभनीय दृष्य सध्या निर्माण होते आहे.

अनेक जण सहकुटुंब हजेरी लावताना रामतीर्थात डुबकी घेत गोदावरी मातेची मनोभावे प्रार्थना करताना बघायला मिळत आहेत. दरम्‍यान राज्‍यातील इतर शहरांतून तसेच परराज्‍यातून आलेल्‍या भाविकांमुळे गाडगे महाराज पूल परिसरातील वाहनतळ वाहनांनी गजबजत आहेत.(latest marathi news)

Nashik News : पर्यटनाला आला बहर! रामतीर्थावर वाढली वर्दळ, स्‍थानिकांसह पर्यटकांची हजेरी
Nashik News : संभाजीनगर रोडवरील अतिक्रमणांचा बंदोबस्त! येवल्यात नगरपालिकेची कारवाई, भाजी विक्रेत्यांना तंबी

गोदाआरतीला तरुणांची गर्दी

सायंकाळी होणाऱ्या गोदाआरतीला भाविकांची विक्रमी गर्दी होत आहे. विशेष म्‍हणजे उपस्‍थितांमध्ये तरुणाईची संख्या लक्षणीय राहाते. आरतीदरम्‍यानचे दृष्य मोबाईलमध्ये टिपून सोशल मिडीयावर व्‍हायरल केले जात आहेत.

रामतीर्थावरील क्षणचित्रे...

* ऊन तापण्यापूर्वी धार्मिक विधी आटोपण्यावर भर

* दिवसभर पर्यटक, स्‍थानिकांचा रामतीर्थ परिसरात वावर

* स्‍थानिक व्‍यावसायिकांना प्रतिसाद, अर्थचक्र गतिमान

* गांधी तलाव कोरडाठाक असल्‍याने हिरमोड

* सायंकाळी रामतीर्थ परिसराला जत्रेचे स्वरूप

* रात्री उशिरापर्यंत आवारात भाविकांची उपस्‍थिती.

Nashik News : पर्यटनाला आला बहर! रामतीर्थावर वाढली वर्दळ, स्‍थानिकांसह पर्यटकांची हजेरी
Nashik News : सलग सुट्यांना लागून मतदान घेऊ नये; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे निवडणूक आयोगाला पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com