Nashik City Transport : गायकवाड सभागृह परिसरात वाहतूक बंदी! उद्यापासून अंमलबजावणी

Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्‍यक साहित्याचे वाटप व पुन्‍हा जमा करण्याची प्रक्रिया भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे पार पाडली जाणार आहे.
Traffic ban
Traffic banesakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्‍यक साहित्याचे वाटप व पुन्‍हा जमा करण्याची प्रक्रिया भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे पार पाडली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कामात अडथळा येऊ नये, या उद्देशाने इतर वाहनांसाठी परिसरातील मार्गात इतर वाहनांसाठी दोन दिवसांची बंदी असणार आहे. (Nashik Traffic ban in Gaikwad auditorium area)

रविवारी (ता. १९) सकाळी सहापासून ही बंदी लागू राहणार आहे. पोलिस उपायुक्‍त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केलेली आहे. अधिसूचनेत म्‍हटले आहे, की मतदान साहित्याचे वाटप कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे केले जाणार आहे. तसेच निवडणुकीनंतर साहित्‍य जमा करण्याची प्रक्रियादेखील राबविली जाणार आहे.

या प्रक्रियांसाठी मोठ्या संख्येने वाहने अधिगृहीत केलेली आहे. संबंधित वाहने रविवारी सकाळी सहाला सभागृहाच्‍या आवारात दाखल होणार आहेत. त्‍याअनुषंगाने परिसरात वाहतुकीचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. (latest marathi news)

Traffic ban
Nashik News : नाशिकमधील होर्डिंग्ज नियमात; ॲडव्हर्टायझिंग असोसिएशनचा दावा

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी परिसरातील मार्ग रविवार (ता. १९) व सोमवार (ता. २०) असे दोन दिवस सर्व प्रकारच्‍या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. नागरिकांच्‍या सोयीसाठी वाहतूक मार्गात बदल केला आहे.

...या मार्गावर अन्‌ असे आहेत बदल

गायकवाडनगर ते हिरवेनगर नंदिनी (नासर्डी) नदी बाजूकडील मार्गावर सर्वसाधारण वाहतुकीसाठी सर्व प्रकारच्‍या वाहनांना प्रवेश बंद असेल. रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी सातपर्यंत, तसेच सोमवारी दुपारी चारपासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीत बदल लागू राहणार आहेत.

Traffic ban
Nashik Lok Sabha Election : 107 वृद्ध, 10 दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com