Nashik News : सिन्नर- निफाड रस्त्यावर वाहतूक कोंडी! भाजीपाला विक्रेत्यांनी थाटली दुकाने

Nashik News : शहरातील विजयनगरसमोरील तहसील कार्यालय ते वावी वेसपर्यंत रस्त्याच्या एका बाजूला अस्ताव्यस्त भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.
Traffic File photo
Traffic File photoesakal

सिन्नर : शहरातील विजयनगरसमोरील तहसील कार्यालय ते वावी वेसपर्यंत रस्त्याच्या एका बाजूला अस्ताव्यस्त भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. यामुळे सिन्नर ते निफाड रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांना जाण्यासाठी कसरत करावी लागत होती.

वाहतूक कोंडी होत होती. एखादा ट्रक आल्यावर वाहनांना जाण्यासाठी रस्ता शिल्लक राहत नव्हता. या रस्त्यावर मोठा अनर्थ घडू नये, यासाठी भाजी विक्रेत्यांनी चारचाकी जाईल, एवढा रस्ता मोकळा ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Nashik Traffic jam on Sinnar Niphad road Shops lined with vegetable sellers marathi news)

Traffic File photo
Nashik Water Crisis : भूगर्भातील पाणीसाठा खालावला; शेततळीही पडू लागली कोरडी!

दुपारी चारनंतर ग्राहकांची बाजारात गर्दी

उन्हाच्या तडाख्याचा परिणाम गावोगावी भरणाऱ्या आठवडे बाजारांवर होऊ लागला आहे. सायंकाळी ग्राहक बाजारात येत असल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे. तालुक्यातील वडांगळी, वावी, देवपूर, नांदूर शिंगोटे, सोमठाणे, पंचाळे, मेंढी आदी आठवडे बाजारात दुपारी शुकशुकाट जाणवला.

गेल्या १५ दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. यामुळे ग्राहक बाजार करण्यासाठी दिवसभर येत नाहीत. सायंकाळी ग्राहक घराबाहेर येत आहेत. सिन्नर शहरात रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात दुपारी शुकशुकाट होता. अनेकांनी रस्त्यावर पाल लावून भाजीपाला विक्रीसाठी ठेवला होता. ग्राहकांनी दुपारी चारनंतर बाजारात गर्दी केली. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या शेतकरी राजाला दिवसभर उन्हातच बसावे लागले. (Latest Marathi News)

Traffic File photo
Nashik News : दीड वर्षाच्या रायबाने 6 तासात सर केला शिवनेरी किल्ला! उमराणेतील बालकाचा संकल्प पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com