Nashik Traffic Problem : रस्त्यालगतच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा; वाहतुकीला अडथळा

Traffic Problem : विक्रेत्यांच्या मांडलेल्या व्यवसायामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते.
Encroachment increased in the city
Encroachment increased in the cityesakal

Nashik Traffic Problem : दिवसेंदिवस शहरातील रस्त्यालगत विक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जात आहे. ठिकठिकाणी फळविक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांच्या मांडलेल्या व्यवसायामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. अडथळा निर्माण करणार्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा देखावा केला जातो. तर, पोलिसांकडूनही वाहतुकीला अडथळा ठरणार्या व्यावसायिकांविरोधात कारवाईसाठी महापालिकेकडे अंगुलीनिर्देश केला जातो. (Encroachment along road obstructs traffic in city )

परंतु याचा त्रास वाहनचालकांना होत असून अनेकदा मनस्तापाला सामोरे जावे लागते. शहरातील वाहतूक कोंडीचा विषय गंभीर असताना, त्यात रस्त्यालगत थाटलेल्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणाची भर पडते आहे. शहराच्या मुख्य बाजार पेठांमध्ये व्यावसायिकांकडून आपल्या दुकानांसमोरच फलक लावले जातात. तर काही रस्त्यावर दुकानांसमोरच स्वत:च्या वाहनांची पार्किंग केलेली असते.

परिणामी ग्राहकांना त्यांची वाहने रस्त्यालगत पार्क करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन, एमजी रोड, मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा याठिकाणी असे प्रकार नित्याचे होतात. वाहतूक शाखेकडून टोईंग सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, अशा वाहनांवर कारवाई केल्यास वादावादीचे प्रसंग होतात. तसेच, शहरातील बहुतांशी रस्त्यांलगत फळविक्रेत्यांकडून अतिक्रमण केले जाते आहे.

उंटवाडी रोडवरील सिटी सेंटर मॉल सिग्नलवर अशा व्यावसायिकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केलेले आहे. याच रस्त्यावर सकाळी आणि सायंकाळी मोठ्याप्रमाणात वाहनांची रहदारी असते. तर काही वाहनचालक अशा व्यावसायिकांसमोर त्यांची वाहने थांबवून फळांची खरेदी करीत असतात. परंतु त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडीची समस्या उद्‌भवत असते. अशीच स्थिती कॉलेजरोड, गंगापूर रोड या रहदारीच्या रस्त्यावर असते. (latest marathi news)

Encroachment increased in the city
Nashik Traffic Problem : शालिमार चौकास अतिक्रमणधारकांचा गराडा; रिक्षाचालकांची सर्रास मनमानी

परंतु यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत नसल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर अशारितीने अतिक्रमण करणार्या व्यावसायिकांचे प्रमाण वाढते आहे. वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात येणार्या अडथळ्यांबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे पाठपुरावा केला जातो परंतु, कारवाई होत नसल्याची ओरड पोलिसांची आहे.

स्मार्ट पार्किंगवरही अतिक्रमण

शहराच्या मुख्य बाजारपेठ, कॉलेजरोड, गंगापूर रोड या ठिकाणी वाहनतळ नसल्याने बेशिस्तपणे वाहनांची पार्किंग होते. त्याचा परिणाम वाहतूकीवर होतो. त्यामुळे शहरातील काही रस्त्यावर स्मार्ट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी पांढरे पट्टे आखून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी मार्किंग करण्यात आलेली आहे.

परंतु या मार्किंगवरही हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री करणार्यांनी अतिक्रमण केलेले आहे. यामुळे वाहनांना अनधिकृत ठिकाणी पार्किंग करावी लागते. तर, व्यावसायिकांकडून मुजोरी केली जाते. मात्र, यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही. परंतु त्याचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागतो.

''रस्त्यालगत अनधिकृतपणे व्यवसाय करणार्यांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे पत्रान्वये पाठपुरावा केलेला आहे. तसेच, अडथळा येणार्या ठिकाणचे हॉकर्स झोन वाहतूक शाखेकडून रद्द केलेले आहे. रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.''- दिवाणसिंह वसावे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा-२

Encroachment increased in the city
Nashik Traffic Problem : होळकर पुलावर टोइंग कधी? अघोषित पार्किंगने वाहतूक कोंडीत भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com