Nashik Railway : मनमाडहून वाहतूक पुण्यामार्गे वळवली; अनेक गाड्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

Nashik Railway : वाशिंद रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेचा ओव्हरहेड वीजपुरवठा बंद झाला.
Crowd of passengers at the railway station here.
Crowd of passengers at the railway station here.esakal

Nashik Railway : वाशिंद रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेचा ओव्हरहेड वीजपुरवठा बंद झाला. परिणामी, या मार्गावरील जाणारी व येणारी वाहतूक ठप्प झाली. यामुळे रेल्वे प्रशासनाने अनिश्‍चित काळासाठी रेल्वेसेवा बंद झाल्याची घोषणा केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मनमाड स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या. गाडी क्र. १२०७२ हिंगोली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. (train diverted from Manmad to Pune many passengers inconvenienced )

शनिवारी (ता. ६) पहाटे मध्य रेल्वेच्या कसारा ते आटगाव रेल्वेस्थानकांदरम्यान लोहमार्गावर माती ढासळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. रविवारी (ता. ७) सकाळच्या सुमारास लोहमार्गावरील माती काढण्याचे काम सुरू असल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक तीन तासांहून अधिक काळ ठप्प झाली.

मनमाडमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या मनमाड स्थानकात जवळपास दोन तासांहून अधिक वेळ थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. माती काढण्यास वेळ लागत असल्याने मनमाडमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या. काही गाड्या नाशिक, इगतपुरीपर्यंत चालविण्यात आल्या. (latest marathi news)

Crowd of passengers at the railway station here.
Nashik-Pune Railway: नाशिक-नगर-पुणे रेल्वे मार्गाचं काम कुठे अडलंय? कधी सुरु होणार?; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

हिंगोली- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेस, भुसावळ- इगतपुरी एक्स्प्रेस मनमाड स्थानकातून रद्द. धुळे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस नाशिक स्थानकातून रद्द.

मनमाड स्थानकातून वळविलेल्या गाड्या

१) बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

२) पटना- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

३) गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

४) हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस

Crowd of passengers at the railway station here.
Nashik Pune Railway : पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे नको : आमदार सत्यजित तांबे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com