Nashik News : विद्यार्थ्यांनी बघितली खरीखुरी रेल्वे!

Nashik : ज्या वस्तीत मोटरसायकल जाण्यासाठी देखील रस्ता नाही तेथे इतर वाहने कशी जाणार.. वाहने नाही जाणार तर तेथील मुले कशी बघणार, त्यांना वाहने माहित कशी होणार.. वाहने त्यांनी फक्त चित्रपटातच बघितलेली.
Shaligram Mali, Ananda Wagh, Principal Pankaj Sonwane, Suresh Bhabad and railway staff with the children.
Shaligram Mali, Ananda Wagh, Principal Pankaj Sonwane, Suresh Bhabad and railway staff with the children.esakal

वेहेळगाव : ‘ज्या वस्तीत मोटरसायकल जाण्यासाठी देखील रस्ता नाही तेथे इतर वाहने कशी जाणार... वाहने नाही जाणार तर तेथील मुले कशी बघणार, त्यांना वाहने माहित कशी होणार... वाहने त्यांनी फक्त चित्रपटातच बघितलेली. हीच बाब हेरुने शिक्षकांनी खरीखुरी वाहने बघण्याचा व त्यात बसण्याचा अनुभव देऊन मुलांचा आनंद द्विगुणीत केला. (Nashik Tribal children from Kusumbinala school saw real Khuri train)

सध्या सहल आयोजनाचे दिवस असल्याने अनेक दिवसांपासून मुलांची दररोज विचारणा सुरू होती. सहलीला न्यायचे म्हणजे मुलांना मजा किंवा फिरणे म्हणून नाही तर त्यांना एक वेगळा अनुभव द्यायचा, असे शिक्षकांनी ठरवले. मग, विद्यार्थ्यांना रेल्वेची सफर करायचे ठरले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनी चर्चेतून सहल कुठे न्यायची ते ठरवले.

ज्यांनी फक्त आपला जिल्हा नावाने व नकाशात पाहिला आहे त्याठिकाणी म्हणजे नाशिकला रेल्वेनेच जायचे ठरले. रविवारी रेल्वेला गर्दी कमी असते म्हणून रविवारचे बुकींग केले. कुसंबीनाला येथून पायी वेहेळगाव गाठले. तेथून एसटी बसचा प्रथम अनुभव घेऊन नाशिकला जाण्यासाठी नांदगाव रेल्वे स्टेशनवर आले.

सर्वांनीच पहिल्यांदा रेल्वे स्टेशन पाहिले आणि भारावून गेले. प्लॅटफॉर्मवर जाताना मजा वाटत होती. वरून आपण जातोय आणि खालून गाडी जाते, याचे अप्रूप मुलांना वाटत होते. तेवढ्यात रेल्वेची अनाउंसमेन्ट झाली अन् विद्यार्थी अनुराजने प्रश्‍न केला, कोणती बाई बोलतेय आणि आपल्याला दिसत पण नाही.

पंकज सोनवणे सरांनी मुलांच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी तयारी केली. एकएक प्रश्‍न सोडवित गेले आणि सहलीचा उद्देश तिथूनच सफल झाल्याचे दिसायला लागले. स्टेशनवरील अनेक प्रवाशांनाही या मुलांचे कौतुक वाटत होते. (latest marathi news)

Shaligram Mali, Ananda Wagh, Principal Pankaj Sonwane, Suresh Bhabad and railway staff with the children.
Nashik Lok Sabha Code of Conduct: आचारसंहितेमुळे शहरावर पाणी संकट! पाण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव आयोगाच्या कोर्टात

अशी सहल फक्त जिल्हा परिषद शाळाच करू शकते, असे बोल प्रवाशांमधून ऐकू आल्याने आपण जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असल्याचा अभिमानही शिक्षकांना झाला. सर्वजण गाडीत बसले. बाहेरचे पळणारे दृश्य पाहून सर्वांचेच चेहरे उजळले होते. पहिल्यांदाच रेल्वेत बसण्याचा अनुभवच वेगळा होता.

नाशिकला उतरताच विद्यार्थी भारावले

रेल्वेने नाशिक स्टेशनवर उतरताच अनेक विद्यार्थ्यांच्या तोंडून आले वॉव असे शब्द निघाले. पायऱ्या उतरल्यावर स्टेशनवरील महिला सफाई कर्मचाऱ्यांनी मुलांसोबत फोटो काढले. बाहेर पडताच त्र्यंबकेश्‍वरला जाण्यासाठी सिटीलिंक बस उभी होतीच. अगदी रिकामी. वाहकाच्या मदतीने सर्व मुलांना एकसारख्या एकच रांगेतील सीट मिळाल्या आणि मुले खुश झाली. त्र्यंबकला जाताना नाशिक शहर, पुढे डोंगर, आजूबाजूची हिरवळ, लाल-हिरवे सिग्नल बघतच त्र्यंबकवारी झाली.

प्रवास पुन्हा परतीच्या दिशेने

त्र्यंबकहून नाशिकमध्ये आल्यावर वेदमंदिर आणि मग मुख्य आकर्षण गोदाघाट, रामकुंड, श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा सगळे कसे वेळेत झाले. मग पुन्हा सुरु झाला परतीचा प्रवास... नाशिक रोड स्टेशनला सिटीबस रात्री ८:४५ वाजता पोहचली. काही वेळातच नाशिक- बडनेरा गाडीत विद्यार्थी बसले आणि १०:४५ वाजता नांदगाव स्टेशनवर उतरून सहलीचा समारोप झाला.

Shaligram Mali, Ananda Wagh, Principal Pankaj Sonwane, Suresh Bhabad and railway staff with the children.
Nashik Success Story : कळवणचा अनिल दळवी सहाय्यक गटविकास अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com