नाशिक: बाह्यस्त्रोतांद्वारे भरती विरोधात महिन्याभरापासून बिऱ्हाड आंदोलन सुरू असताना शासनाने दोन खासगी कंपन्यांना कंत्राट दिले आहे. त्याविरोधात आंदोलक अधिक आक्रमक झाले असून, त्यांनी शुक्रवारी (ता. ८) जोरदार घोषणाबाजी करत आयुक्तालयात घुसण्याचा प्रयत्न केला. जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी या आंदोलकांशी चर्चा करत प्रशासनाने त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.