Nashik News : अंबड, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी संपवले जीवन

Nashik News : याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, सदर घटनेमागील कारणं समजू शकलेले नाही.
death
deathesakal

Nashik News : अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन युवकांनी राहत्या घरांत गळफास लावून घेत आत्महत्त्या केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Two people ended their lives in different incidents)

अंबड परिसरातील दत्तनगरमध्ये एकाने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. राहुल सुखलाल महाजन (२९, रा. दत्तनगर, कारगिल चौक, अंबड) असे मयत युवकाचे नाव आहे. राहुल याने बुधवारी (ता ३) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना बेडरुममध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली.

यप्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अंमलदार चव्हाण तपास करीत आहेत. तर दुसऱ्या घटनेत सातपूर कॉलनीतही ३० वर्षीय युवकाने गळफास लावून घेतला. विनय नितीन विसपुते (३०, रा. एमएचबी कॉलनी, समता नगर, सातपूर कॉलनी, सातपूर) असे मयत युवकाचे नाव आहे. (latest marathi news)

death
Nashik Crime: हल्ल्यात जखमी झालेल्या सोमठाणे येथील तरुणाचा मृत्यू; सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप

विनय याने मंगळवारी (ता. २) रात्री अकराच्या सुमारस राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. भाऊ निखिल याने त्यस उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, सहायक उपनिरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत. आत्महत्तेमागील कारण समजू शकलेले नाही.

death
Crime News : झोपेत असलेल्या बेघराला नशेखोर गुंडांनी पेटवले!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com