
नाशिक : गोदावरी नदीपात्रात दुचाकी पडून दोघांचा मृत्यू
म्हसरूळ (नाशिक) : कन्नमवार पुलावरून जात असलेल्या दुचाकीला शुक्रवारी (ता. २९) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अपघात होऊन दुचाकी गोदावरी नदीपात्रात पडून दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Two persons died after falling into Godavari river with bike)
याबाबत आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश सुरेश निकम (वय २३, पत्ता उपलब्ध नाही) व योगेश दुसाने (वय २४, पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. गणेश व योगेश हे दोघे जण शुक्रवारी (ता. २९) रात्री अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच १९, डिजी ३७९४) आडगाव कडून द्वारकाच्या दिशेने जात होते. या सुमारास कन्नमवार पुलावर दुचाकीला अपघात होऊन दुचाकी पुलावरून थेट गोदावरी नदी पात्रात पडली. या घटनेत गणेश व योगेश या दोघांच्या डोक्यास व हातापायांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, या दोघांना अॅम्ब्युलन्स मधून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.
हेही वाचा: नाशिक : कमी वयात रेशीम गाठ बांधणाऱ्यांचा रोखला विवाह
हेही वाचा: नाशिक : डॉक्टरांना अखेर पर्यायी भूखंड उपलब्ध
Web Title: Nashik Two Persons Died After Falling Into Godavari River With Bike
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..