Nashik ZP News : जिल्हा परिषदेत दिव्यांग सेवाज्येष्ठता यादीत यूडीआयडी क्रमांक बंधनकारक

Nashik ZP : आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणीसाठी सामान्य प्रशासन विभागाने दिलेली डेटलाइन शुक्रवारी (ता. १९) संपुष्टात आली आहे.
Nashik ZP News
Nashik ZP News esakal

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणीसाठी सामान्य प्रशासन विभागाने दिलेली डेटलाइन शुक्रवारी (ता. १९) संपुष्टात आली आहे. यात, ज्या कर्मचाऱ्यांनी पडताळणी (यूडीआयडी-दिव्यांग ओळखपत्र) काढले नाहीत त्या कर्मचाऱ्यांना सायंकाळी उशिराने नोटिसा काढण्यात आल्या आहेत. ()

दुसरीकडे सामान्य प्रशासन विभागाने दिव्यांग सेवाज्येष्ठता यादीत यूडीआयडी क्रमांक बंधनकारक करत या क्रमांकासह यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून यूडीआयडी काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग प्रमाणपत्राच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागांना पत्र काढून पडताळणी करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला विभागांकडून केराची टोपली दाखविली. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी पत्र काढत प्रमाणपत्र पडताळणीचे निर्देश दिले होते. याच पार्श्वभूमीवर मित्तल यांनी विभागप्रमुखांच्या घेतलेल्या बैठकीत अनेक विभागातील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी अद्यापही झालेली नसल्याचे निदर्शनास आले. (latest marathi news)

Nashik ZP News
Nashik ZP News : जि.प. शिक्षणाधिकारी पहिल्या घंटीला शाळेवर; अचानक शाळांना भेटी देऊन केली पाहणी

यानंतर परदेशी यांनी घेतलेल्या आढाव्यात मुख्यालयासह पंचायत समितीतील एकूण १८ हजार ६६८ मंजूर पदांपैकी १५ हजार ११३ पदे भरलेली आहे. यातील ६०९ कर्मचाऱ्यांकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर यातील ४११ कर्मचाऱ्यांनी पडताळणी करत यूडीआयडी क्रमांक काढला आहे. १९८ कर्मचाऱ्यांनी हा क्रमांक काढलेला नसल्याचे निदर्शनास आले होते. यात सर्वाधिक १४८ शिक्षकांचा समावेश आहे. यूडीआयडी न काढलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने १९ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती.

ही मुदत संपली असून, विभागाकडून आढावा घेण्याचे काम सुरू होते. यात, जिल्हा शासकीय रुग्णालयात अर्ज केल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नेमकी आकडेवारी प्राप्त झाली नाही. मात्र यूडीआयडी न काढणाऱ्यांना नोटिसा बजाविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात सामान्य प्रशासन विभागांतर्गत १२ कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी काढलेला यूडीआयडी क्रमांक हा सेवाज्येष्ठता यादीत समाविष्ट करूनच यादी तयार केली जाणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

Nashik ZP News
Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे अखर्चित 32 कोटी शासन दरबारी; 94.28 टक्के निधी खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com