Nashik News : उंबरदरी धरणातून अनधिकृत पाणी उपसा; टंचाईचे संकट

Nashik : तालुक्याती अनेक गावांतील विहिरी, कूपनलिका व नद्या कोरड्या पडत चालल्या असून, अशा परिस्थितीत ठाणगावजवळील उंबरदरी धरणातून पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे.
Unauthorized withdrawal of water from the dam
Unauthorized withdrawal of water from the damesakal

सिन्नर : तालुक्याती अनेक गावांतील विहिरी, कूपनलिका व नद्या कोरड्या पडत चालल्या असून, अशा परिस्थितीत ठाणगावजवळील उंबरदरी धरणातून पाण्याचा अवैध उपसा सुरू आहे. अवैध उपसा सुरूच राहिला, तर पाच-सहा दिवसांत पाणीटंचाईला लवकर सामोरे जावे लागेल. त्यासाठी पाटबंधारे विभागाने वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. (Nashik Unauthorized water withdrawal from Umbardari dam)

उंबरदरी धरणाची क्षमता ५२ दशलक्ष घनमीटर असून, काही वर्षांपूर्वी ग्रामस्थ व युवा मित्र संस्थेने धरणातून मोठ्या प्रमाणात गाळ काढला होता. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. काही लोकांनी रात्री मोटरी लावून पाणी उपसा सुरू केल्याने साठा कमी होत आहे. उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गावांची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविली आहे.

या योजनेंतर्गत ठाणगाव, पाडळी, टेंभुरवाडी, हिवरे आणि पिंपळे या गावांना पाणीपुरवठा केला जातो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरपंच नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाणी उपसा करणाऱ्यांच्या कृषीपंपाच्या केबल्स काढल्या. तरीही मध्यरात्री एकाच रात्री चाळीसहून अधिक विद्युतपंप धरणात टाकून पाणी उपसा केला जात असल्याचे दिसून आले आहे.(latest marathi news)

Unauthorized withdrawal of water from the dam
Nashik Vegetables Rate Hike : पालेभाज्या, फळभाज्यांना आला ‘भाव’! उन्हामुळे आवक घटत चालल्याचा परिणाम

जलसंधारण विभाग आणि तहसीलदारांनी या गोष्टीची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. यावर तत्काळ कारवाई न झाल्यास ठाणगावसह परिसराला पुढील दोन महिने टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

कपडे धुतल्यास दंड

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, नागरिक कपडे धुण्यासाठी धरणाच्या पाण्याचा वापर करतात. तेच पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ नये, म्हणून धरणावर कपडे धुण्यासाठी कोणी येऊ नये, अन्यथा दंड आकारला जाईल, असे आदेश ग्रामपंचायतीने काढले आहेत.

Unauthorized withdrawal of water from the dam
Nashik Success Story : शेतकऱ्याचा मुलगा बनला विस्तार अधिकारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com