Nashik Unseasonal Rain Damage: अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी पुन्हा उद्वस्त; बागलाणमध्ये हजार हेक्टरवरील द्राक्षाला फटका

Cracking and falling grapes due to weathering in the vineyard of Keshav Mandwade, a grape grower & Cracking of grapes due to hail
Cracking and falling grapes due to weathering in the vineyard of Keshav Mandwade, a grape grower & Cracking of grapes due to hailesakal

सटाणा : बागलाण तालुक्याला दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले असून काढणीस आलेला लालकांदा, द्राक्ष, डाळिंब, काढणीसाठी झाकून ठेवलेला मका, काकडी, टोमॅटो, तूर, वाल आदी भाजीपाला पिके वाया गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्वच द्राक्षबागांमध्ये क्रॅकिंग झाले आहे.

अवकाळीचा किमान एक हजार हेक्टरवरील द्राक्षबागांचे क्षेत्र बाधित झाले आहे. या हंगामात अतिशय चांगले पीक आले होते, यंदा भाव बरा मिळत असताना निर्यातही चांगली सुरू झाली होती. मात्र अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांची बोलती बंद झाली आहे. (Nashik Unseasonal Rain Damage Farmers again distressed by unseasonal rain Bagalan grapes on thousand hectares affecte)

तालुक्यात रविवारी (ता.२६) सकाळपासूनच अवकाळीने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरवात केली. विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वत्र दाणादाण उडाली. पावसाळ्यातही झाला नव्हता असा पाऊस काही ठिकाणी पहायला मिळाला.

बहुतांश लाल कांदा उत्पादकांनी आपला तयार कांदा उपटून शेतात ठेवला होता. अचानक आलेल्या पावसाने शेतातील कांदा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड अपुरी पडल्याने कांदा भिजला.यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे.

कांदा उत्पादकांना दुहेरी फटका

उन्हाळी कांदा लागवडीसाठी मशागतीची कामे, रासायनिक खते कीटकनाशके देऊन लागवड सुरू केलेल्या शेतकऱ्यांचे तर होत्याचे नव्हते झाले आहे. लागवडीसाठी सध्या रोजंदारीने मजूर मिळत नाहीत.

एकरी कंत्राटी पद्धतीने उन्हाळी कांदा लागवड करण्याचा ठेका दिला तरच लागवड करणे शक्य होते. एकरी लागवड क्षेत्रावर आधारित ठेका देऊनही आता अवकाळीमुळे त्या क्षेत्रात लागवड न झाल्याने मजुरांना ठरल्याप्रमाणे रक्कम चुकती करणे कांदा उत्पादकांवर बंधनकारक झाले आहे.

कांदा लागवडीवर परिणाम

उन्हाळी कांदा लागवडीसाठी उपटून ठेवलेले हिरवे कांदा ऊळे आता या अवकाळी पावसात सडून जाणार आहेत. जमिनीचा लागवडीयोग्य वाफसा जाऊन वाफ्यांमध्ये सर्वत्र पाणी साचल्याने आता कांदा लागवड लांबणीवर पडली आहे.

लागवडीयोग्य हिरवे ऊळे मुळकुजचे बळी ठरणार आहे. गेल्या दोन दिवसात सटाणा मंडळात सर्वाधिक ३३ मिमी तर ताहराबाद मंडळात सर्वाधिक कमी म्हणजे ०६ मि मी पाऊस पडला असल्याची नोंद झाली आहे.

Cracking and falling grapes due to weathering in the vineyard of Keshav Mandwade, a grape grower & Cracking of grapes due to hail
Jalgaon Unseasonal Rain: जिल्ह्यात 24 तासांत 31.8 मिलिमीटर पाऊस; गारपिटीने मोठे नुकसान

द्राक्षमणींचा बागेत खच

तालुक्यात बहुतांश अर्ली द्राक्ष घेतली जातात. या द्राक्षांचा हंगाम सुरू झाल्यानंतर एक्सपोर्टला ९० ते १४० रुपये प्रति किलो तर स्थानिक बाजारपेठेत ७० ते ९० रुपये प्रति किलो भाव सहज मिळत होता.

अजून महिनाभर तरी चांगले दर मिळतील अशी अपेक्षा द्राक्ष बागायतदारांना असतानाच अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आता द्राक्षबागेत पडलेला द्राक्षांचा खच एकत्र करून तो मिळेल त्या भावाने विकणे एवढाच शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला आहे.

मंडळनिहाय पाऊस

१)सटाणा : ३८ मिमी

२)ब्राह्मणगाव : ३३ मिमी

३)वीरगाव : ०८ मिमी

४)नामपूर : ३० मिमी

५)मुल्हेर : ०८ मिमी

६)ताहाराबाद : ०६ मिमी

७)डांगसौंदाणे : १३मिमी

८)जायखेडा : २२ मिमी

Cracking and falling grapes due to weathering in the vineyard of Keshav Mandwade, a grape grower & Cracking of grapes due to hail
Nashik Unseasonal Rain Damage: 33 हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा; सर्वाधिक फटका द्राक्ष पंढरीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com