Nashik Zika Virus Update: झिका रुग्ण आढळलेल्या भागात मच्छरदाणी वापरा! वैद्यकीय विभागाचा नागरिकांना सल्ला

Zika Virus
Zika Virusesakal

नाशिक : वडाळा रोड परिसरातील भारतनगर झोपडपट्टीत चोविसवर्षीय युवकाच्या लघवी तपासणीत झिकाचे विषाणू आढळून आल्यानंतर या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेतला जात आहे.

आतापर्यंत १९ गर्भवती महिला आढळल्या असून, त्या महिलांचे रक्तजल (सिरम) नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, झिकाचा रुग्ण ज्या भागात आढळला आहे त्या भागातील तीन किलोमीटर परिघातील गर्भवती महिलांना मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे. (Nashik Update Use mosquito nets in Zika affected areas Medical Department Advice to Citizens)

भारतनगर भागातील २४ वर्षीय युवकाला झिकाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा ‘अलर्ट मोड’मध्ये आली. झिकाचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असून, गर्भवती महिलेला झिकाची लागण झाल्यास जन्मजात विकृतीसह जन्माला येते.

त्यामुळे ज्या भागात झिका रुग्ण आढळला, त्या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेऊन त्यांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पुणे येथील कार्यशाळेत पाठविले जातात.

भारतनगर येथे झिका रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेसना गर्भवती महिलांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिल्या टप्यांत पाच गर्भवती महिला आढळल्या, दुसऱ्या टप्प्यात पंधरा अशा एकूण १९ गर्भवती महिला आढळल्या आहेत.

Zika Virus
Zika Virus: चिंता वाढली! महाराष्ट्रात आढळले झिकाचे ५ रुग्ण; काळजी घेण्याचे आवाहन

त्या महिलांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. झिकाचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना आहे.

ज्या भागात झिका रुग्ण आढळला, त्या तीन किलोमीटर भागातील गर्भवती महिलांना मच्छरदाणी वापरावी, गुडनाईट ओडोमॉसचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आठवड्यातून घरात एक दिवस कोरडा दिवस पाळा, घरातील पाणीसाठा तपासण्याचे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

Zika Virus
Nashik Zika Virus: गर्भवती महिला शोधताना डॉक्टरांची दमछाक; भारतनगरमध्ये ‘झिका’चा पहिला रुग्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com