Nashik Ram Rathotsav : रामरथ, गरुड रथ मिरवणूक आज कडेकोट पोलिस बंदोबस्त; वाहतूक मार्गातही बदल

Ram Rathotsav : पंचवटीतून उद्या (ता. १९) रामरथ, गरुडरथ मिरवणूक काढण्यात येणार असून त्या पार्श्‍वभूमीवर मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
ramrath
ramrath esakal

नाशिक : पंचवटीतून उद्या (ता. १९) रामरथ, गरुडरथ मिरवणूक काढण्यात येणार असून त्या पार्श्‍वभूमीवर मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे. दरम्यान, मिरवणूकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मिरवणूक मार्गावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. (Nashik Utsav Ramrath Garud Rath Procession Today Strict Police Security marathi news)

रामनवमीनंतर पंचवटीतील काळाराम मंदिरातून रामरथांची भव्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. त्यानुसार, उद्या (ता.१९) काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून दुपारी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

सदरची मिरवणूक नागचौक, चरण पादूका चौक, लक्ष्मण झुलापुल, जुना आडगाव नाका, गणेशवाडी रोड, मरिमाता मंदिर, म्हसोबा पटांगण, संत गाडगे महाराज पुलाखालून नेहरू चौक, चांदवडकर गल्ली, धुमाळ पॉईन्ट, मेनरोड, बोहरपट्टी, जुना सरकारवाडा पोलिस ठाणे, सराफ बाजार, भांडी बाजार, म्हसोबा पटांगण, सांडवा देवी मंदिर, भाजीबाजार, अहिल्याराम व्यायामशाळा, रामकुंड, परशराम पुरिया रोडने शनिचौक, हनुमान चौक ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. (latest marathi news)

ramrath
Nashik Ram Navami 2024 : श्रीराम जन्मोत्सवासाठी रामभूमी सज्ज; राम नामाच्या गजराने शहरात चैतन्य

यामुळे, या मिरवणूक मार्ग दुपारी २ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असा आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिले आहेत.

मात्र पोलिस वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना सदरची प्रवेशबंदी लागू असणार नाही. सदरची रामरथ मिरवणूक पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा या तीन पोलिस ठाण्यांच्या हददीतून मार्गस्थ होणार आहे. तसेच, मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

पर्यायी मार्ग

- काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी मार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती-पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅण्ड - रविवार कारंजामार्गे इतरत्र

- काट्या मारुती - संतोष टी पॉईंट - द्वारका सर्कल - सारडा सर्कल मार्गे इतरत्र

ramrath
Nashik Ram Navami 2024 : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क! पोलीस आयुक्तांकडून कडेकोट बंदोबस्ताच्या सूचना

असा आहे बंदोबस्त

पोलिस आयुक्त १

उपायुक्त २

सहाय्यक आयुक्त ४

वरिष्ठ पोलिस निरीक्षक १०

सहाय्यक पोलीस निरीक्षक १५

पोलिस पुरुष ११५

महिला पोलिस ३५

होमगार्ड (महिला/पुरुष) ६०

दंगानियंत्रण पथक

राखीव पोलिस दल २ तुकड्या

ramrath
Nashik Ram Navami 2024 : श्रीराम जन्मोत्सवासाठी रामभूमी सज्ज; राम नामाच्या गजराने शहरात चैतन्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com