Leopard Capture sakal
नाशिक
Leopard Capture : दहशत पसरवणारा बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व श्वानाच्या मदतीने ७ तासांच्या शोधमोहिमेला यश
How a Dog Helped Capture the Leopard in Nashik : दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर श्वानाच्या मदतीने वनविभाग व रेस्क्यू टीमच्या संयुक्त अथक प्रयत्नातून शुक्रवारी जेरबंद करण्यात आला. सलग सात तास शोधमोहीम राबविल्यामुळे प्रयत्नांना यश आले.
नाशिक: वडनेर दुमाला व पिंपळगाव खांब येथे दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर श्वानाच्या मदतीने वनविभाग व रेस्क्यू टीमच्या संयुक्त अथक प्रयत्नातून शुक्रवारी (ता.२२) जेरबंद करण्यात आला. सलग सात तास शोधमोहीम राबविल्यामुळे प्रयत्नांना यश आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा शुक्रवारी (ता. २२) सकाळपासूनच वडनेर दुमाला परिसरात दाखल झाला होता. सकाळी नऊपासून शोधमोहीम सुरू झाली अन् दुपारी साडेचारच्या दरम्यान मोहन जाधव यांच्या शेतात बिबट्याला जेरबंद करण्यात आले.