Nashik Vaibhav Deore Case : देवरे पुन्हा इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात!

Nashik News : अवैध सावकारीच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या वैभव देवरेला इंदिरानगर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे.
Crime
Crime esakal

Nashik News : अवैध सावकारीच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या वैभव देवरेला इंदिरानगर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे. रविवारी (ता.२१) देवरे यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान, पोलिस संशयित देवरे यांच्या पत्नीचाही शोध घेत आहेत. (Nashik Vaibhav Deore again in custody of Indiranagar police)

संशयित देवरे यास खंडणीच्या गुन्ह्यात रविवारी (ता.२१) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. इंदिरानगर पोलिसांनी सोमवारी (ता.२२) सकाळी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा देवरे याला ताब्यात घेत अटक केली. जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने देवरे यास गुरुवारपर्यंत (ता.२५) चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक बारेला या करीत आहेत. अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरे याच्याकडून एका महिलेने १० टक्के व्याजाने पैसे घेतले होते. पीडित महिलेने त्यास व्याजासह पैसे दिल्यानंतर देवरे त्यांच्याकडे जादा पैशांची मागणी करीत होता. (latest marathi news)

Crime
Navi Mumbai Crime: पोलिसांनी केली मोठी कारवाई; तब्बल १० लाखांचा एमडी जप्त

महिलेच्या घरी जाऊन शिवीगाळ करीत अश्लील वर्तन करीत होता. त्यातून त्याने महिलेची कार बळजबरीने ओढून आणली होती. त्यानंतरही तो महिलेकडे जादा पैशांची मागणी करीत त्रास देत त्यांचा अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात जबरी चोरी व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस सोनलच्या शोधात

जगन पाटील यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात देवरे याच्यासह त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. त्यामुळे इंदिरानगर पोलिस संशयित वैभवची पत्नी सोनल देवरे हिचा शोध घेत आहेत. देवरे यास अटक केल्यापासून संशयित सोनल देवरे पसार झाली आहे.

Crime
Nashik Crime News : ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना विवाहितेवर अत्याचार; आडगाव पोलिसात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com