Leopard Attack on Farmer Near Nashik
esakal
वणी/ओझर : जऊळके दिंडोरी शिवारात मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या शेतात गव्हाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यावर (Leopard Attack on Farmer) बिबट्याने अचानक हल्ला चढविला. तानाजी खंडेराव जोंधळे (वय ४४) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या पत्नी छाया यांनी आरडाओरड केल्याने बिथरलेल्या बिबट्याने (Leopard attack Nashik) लगतच्या शेतात धूम ठोकली आणि तानाजी यांचे प्राण वाचले. सावित्रीच्या रूपाने पत्नी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. पत्नींच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.