साताऱ्याविरुद्ध नाशिकचा दणदणीत विजय

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत चुरशीचे सामने होत आहेत.
Cricket
Cricketesakal

नाशिक : येथे सुरू असलेल्‍या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत चुरशीचे सामने होत आहेत. हुतात्‍मा स्‍मारकात झालेल्‍या स्‍पर्धेतील दोनदिवसीय कसोटी सामन्‍यात नाशिक संघाने सातारा संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळविला. नाशिककडून साई राठोडने ८७, वेद सोनवणेने ६२, सिद्धार्थ काकडने ५१ धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत समकीत सुराणा, हुजैफ शेख, दीर्घ ब्रह्मेचा, गौरव गोरे, साहिल पारख यांनी भरीव कामगिरी केली.

साताराविरुद्धच्‍या सामन्‍यात नाशिक संघाने पहिल्‍या डावात सर्वबाद २७७ धावा केल्या. साई राठोडने ८७, वेद सोनवणेने ६२, सिद्धार्थ काकडने ५१, हुजैफ शेखने ३६ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल सातारा संघाला सर्वबाद १२२ धावा करता आल्‍या. संघाकडून ओंकार गायकवाडने नाबाद ६७ धावा केल्‍या, तर नाशिककडून हुजैफ शेख, साहिल पारख यांनी प्रत्येकी ३, तर समकीत सुराणाने २ व गौरव गोरेने १ बळी टिपला. फॉलोऑननंतर सातारा संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद १३२ धावा केल्‍या. यात ओम पाटीलने २७ धावांचे योगदान दिले. नाशिककडून समकीत सुराणा, गौरव गोरे व दीर्घ ब्रह्मेचा यांनी प्रत्येकी ३, तर हुजैफ शेखने १ बळी टिपला. नाशिक संघाने एक डाव व २३ धावांनी सातारा संघाचा दणदणीत पराभव केला.

Cricket
एका वर्षात दोनदा रंगणार IPL चा थरार, फॉरमॅटदेखील तयार?

पूना क्‍लब, परभणीने जिंकले सामने

इतर दोन सामन्यांत महात्मानगर क्रिकेट मैदानावर पूना क्लबने जालना विरुद्ध, तर एनसीए मैदानावर परभणीने स्टारने पुणेविरुद्ध निर्णायक विजय मिळविले. पूना क्लब संघाने पहिल्‍या डावात सर्वबाद २३२ धावा केल्‍या. प्रतिस्‍पर्धी जालना संघाने पहिल्‍या डावात सर्वबाद ९२ धावा केल्‍या. फॉलोऑननंतर जालना संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद १०४ धावा केल्‍या. अशात पूना क्‍लब संघाने एक डाव व ३६ धावांनी दणदणीत विजय मिळविला. अन्‍य एका सामन्‍यात स्‍टार, पुणे संघाने पहिल्‍या डावात सर्वबाद १३८ धावा केल्या. उत्तरादाखल परभणी संघाने पहिल्‍या डावात सर्वबाद २५७ धावा करत आघाडी घेतली. दुसऱ्या डावात स्‍टार, पुणे संघाने सर्वबाद १५८ धावा केल्‍या. दोन गड्यांच्‍या मोबदल्यात ४२ धावांचे लक्ष परभणी संघाने सहज गाठून आठ गडी राखून सामना जिंकला.

Cricket
'आयपीएल स्टार' डेव्हिड मिलरचे होणार प्रमोशन, खुद्द कर्णधाराने दिले संकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com