नाशिक: वडनेर दुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीनवर्षीय आयुष भगत या बालकाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, तसेच पंचक्रोशीतील बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा, यासाठी बुधवारी (ता. २०) ग्रामस्थांनी भरपावसात वन विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ‘नरभक्षक बिबट्याला ठार केल्याशिवाय व मागील हल्ल्यांसाठी जबाबदार बिबट्यांना पकडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही’, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी या वेळी घेतली.