Nashik NMC News : होर्डिंग्जधारकांना महापालिकेकडून ताकीद! मुंबईतील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सतर्क

Nashik : घाटकोपर या उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने होर्डिंग कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील जवळपास नऊशेहून अधिक होर्डिंग तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.
NMC Nashik
NMC Nashik esakal

Nashik NMC News : मुंबईतील घाटकोपर या उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने होर्डिंग कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील जवळपास नऊशेहून अधिक होर्डिंग तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर उंच होर्डिंगमध्ये एअर स्पेस ठेवण्याच्या सूचना होर्डिंगधारक कंपन्यांना दिल्या आहेत. अशी माहिती विविध कर विभागाचे उपायुक्त विवेक भदाणे यांनी दिली. (Nashik municipal corporation)

मुंबईतील घाटकोपर भागातील खेडानगरमध्ये पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ एका पेट्रोलपंपावर होर्डिंग फाउंडेशनसह कोसळले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू व ६९ जखमी झाले. त्यामुळे नाशिक महापालिका हद्दीमध्ये असलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याच्या सूचना तातडीने दिल्या. मागील वर्षी पिंपरी चिंचवडमध्ये महामार्गावर अशाप्रकारे होर्डिंग कोसळून जीवितहानी झाली होती.

त्या वेळी शहरातील होर्डिंगधारकांना स्पष्टपणे सूचना देऊन स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्यात आले होते. त्या वेळी घडलेल्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना आता होर्डिंगधारकांच्या कामी येत आहे जवळपास सर्वच होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट यापूर्वीच करण्यात आले आहे.

घाटकोपर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आता होर्डिंगमधील ‘मापातील पाप' शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेत मंजूर असलेले होर्डिंग व त्यावर नमूद असलेल्या मापापेक्षा अधिक माप प्रत्यक्ष जागेवर आढळून आल्यास अशा होर्डिंग्जधारकांवर तातडीने कारवाई केली जाणार आहे. (latest marathi news)

NMC Nashik
Nashik Agriculture News : खरिपाची 6 लाख हेक्टरवर लागवड; जिल्ह्यात खतांचे 2 लाख 20 हजार टन आवंटन मंजूर

बेकायदा होर्डिंग्ज रडारवर

जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधींचा होर्डिंग्ज घोटाळा करण्यात आल्याचा आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टाईजिंग वेल्फेअर असोसिएशनने काही महिन्यांपूर्वी केला. आयुक्तांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठित केली. शहरातील खुल्या जागांवर होर्डिंग्ज उभारण्यासाठी महापालिकेने डिसेंबर २०२१ ला निविदा जारी केली.

त्यात महापालिका हद्दीतील २८ खुल्या जागांवर जाहिरात फलक उभारण्यासाठी दर मागविले होते. निविदा प्रक्रियेअंती संबंधित मक्तेदाराला कार्यादेश देताना मात्र निविदा अटीशर्थींचे उल्लंघन करून खुल्या जागांसह रस्ते, वाहतूक बेट, दुभाजक, इमारती, उद्याने, वापरात असलेल्या व वापरात नसलेल्या जागा, बांधीव मिळकतींवर जाहिरात फलक उभारण्याची परवानगी दिली गेली.

NMC Nashik
Nashik News : पंचायत विकास निर्देशांक संकलनात नाशिक जिल्हा अव्वल! माहितीची 100 टक्के पडताळणी करून माहिती शासनाला सादर

जाहिरात फलकासोबत प्रकाशित फलक, युनिपोल, एलईडी वॉल या सर्वांना परवानगी दिली गेली. २८ ठिकाणी जाहिरात फलक उभारल्याची नोंद असताना शहरात मात्र ६३ ठिकाणी जाहिरात फलक उभारले. होर्डिंग्ज उभारताना चुकीच्या ठिकाणी लावण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच समोरची वाहने दिसत नसल्याने त्यातूनदेखील दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या रडारवर बेकायदा होर्डिंग्ज आले आहे.

"घाटकोपर येथील दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर होर्डिंग्ज तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उंचावरील होर्डिंग्जमध्ये एअर स्पेस टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत." - विवेक भदाणे, कर उपायुक्त, महापालिका.

NMC Nashik
Nashik News : ठाकरे गटातील निफाडचे 5 पदाधिकारी नजरकैदेत! पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com