Nashik Water Crisis: जलकुंभ उदंड, तरीही पाण्याचा ठणठणाट; नियोजनाअभावी टंचाई

Jalakumbh in front of Mahakavi Kalidas Kalamandir.
Jalakumbh in front of Mahakavi Kalidas Kalamandir. esakal

Nashik Water Crisis : तीन धरणांतून होणारा पाणीपुरवठा, ११८ जलकुंभ असूनही जवळपास बावीस लाख लोकसंख्येला पाणी पुरत नाही.

ही वस्तुस्थिती नाशिक शहरात आहे. त्याला एकमेव कारण म्हणजे पाण्याचे वितरण होताना नियोजनाचा अभाव. नियोजन का होत नाही, तर त्यामागे बूस्टर सिस्टम हे कारण आहे. (Nashik Water Crisis Aquifer overflowing water still stagnant Scarcity due to lack of planning)

गोल्फ क्लब मैदानाशेजारी नव्याने बांधलेला जलसाठा.
गोल्फ क्लब मैदानाशेजारी नव्याने बांधलेला जलसाठा.esakal

गंगापूर, दारणा व मुकणे या तीन धरणातून बावीस लाख लोकसंख्येचा नाशिकला पाणीपुरवठा होतो. मुकणेचे पाणी पाथर्डी, विल्होळी, इंदिरानगर, सिडकोचा काही भाग, तसेच मुंबई नाका भागापर्यंत पोचते, तर दारणाचे पाणी नाशिकरोड भागासाठी वापरले जाते.

उर्वरित शहराला गंगापूर धरणाचे पाणी पोचते. मागील वर्षात गंगापूर धरणातून ४४००, दारणातून १०० तर मुकणे धरणातून १६०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित होते.

मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई वगळता राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत आरक्षित केले जाणारे व पाण्याची उपलब्धी अधिक आहे. असे असताना शहराच्या कुठल्या ना कुठल्या भागातून पाण्याची ओरड होतेच.

पाणी अधिक असले तरी नियोजनाचा अभाव व बूस्टर सिस्टम याला कारणीभूत आहे. शहरात सध्या एकूण ११८ जलकुंभाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. पाणी टंचाईच्या तक्रारी वाढल्याच्या अनुषंगाने नव्याने ३० जलकुंभ बांधले जात आहे.

वास्तविक शहरात ९४ ते ९५ जलकुंभाच्या माध्यमातून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा होवू शकतो. फक्त नियोजनाची आवश्‍यकता आहे.

पाणीपुरवठ्याची सध्याची पध्दत

जलकुंभाची पाणी साठवण क्षमता १९० दशलक्ष लिटर आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणांमधून ५६० दशलक्ष लिटर पाणी उपसले जाते. एक जलकुंभ तीनदा भरला जातो. एका जलकुंभावरून एकापेक्षा अधिक भाग जोडले गेले आहेत.

ठरवून दिलेल्या वेळेत पाणीपुरवठा झाल्यानंतर त्या भागातील व्हॉल्व बंद करून अन्यत्र पाणी सोडले जाते. शहरातील जलकुंभ दर पाच तासांनी भरले जातात. अशा पद्धतीने धरणांवरील पंपिंग स्टेशन चोवीस तास कार्यरत राहतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalakumbh in front of Mahakavi Kalidas Kalamandir.
Nashik Citylinc Employees Strike: सिटी लिंक बससेवा पुन्हा ठप्प! वेतनाअभावी वाहक पुन्हा एकदा बेमुदत संपावर

विभागनिहाय जलकुंभ

विभाग संख्या

पूर्व १५

पश्चिम १८

पंचवटी २५

नाशिकरोड १६

सिडको २९

सातपूर १५

------------------------------

एकूण ११८

कामे सुरु असलेली जलकुंभ

पूर्व विभाग- (एकूण २) पखाल रोड, प्रभाग ३० कलानगर.

-पंचवटी- (एकूण ९) मखमलाबाद, म्हसरुळ, तलाठी कॉलनी, मानेनगर (हिरावाडी), प्रभाग २ हनुमाननगर, प्रभाग ३ लुंगे मंगल कार्यालय, पंचवटी फिल्टर (२), तवली डोंगर.

- पश्चिम विभाग- (एकूण ३)- जलधारा, माणिकनगर, महात्मानगर.

- नाशिक रोड- (एकूण ७)- विहीतगाव, देवळाली गाव, वडनेर दुमाला, प्रभाग ८ शिवशक्ती, प्रभाग १७ चंपानगरी, प्रभाग १९ रमाबाई आंबेडकर नगर, सामनगाव रोड.

- सिडको (एकूण ६)- अंबड गाव, कर्मयोगीनगर, राणेनगर, शिवशक्ती चौक, पाथर्डी गाव.

- सातपूर विभाग (एकूण ३)- आशीर्वादनगर, बळवंतनगर, सातपूर

विभागीय कार्यालय.

विभागनिहाय जलकुंभाची पाणी साठवण क्षमता (लाख लिटर्स)

पूर्व- २५८

पश्चिम- २६०.५२

पंचवटी- ३९९.२५

नाशिकरोड- २४३.२५

सिडको- ५२५

सातपूर २१३.५२

पाणी पुरवठ्याची स्थिती

- रोजचा पाणी पुरवठा ५६० दशलक्ष लिटर.

- जलकुंभाची क्षमता १९० दशलक्ष लिटर्स.

- एक जलकुंभ भरण्यासाठी वेळ- ५ तास.

- एक जलकुंभ रिकामा होण्यासाठी वेळ- ३ तास.

दोन वेळ पाणीपुरवठा होणारी क्षेत्र

- पंचवटी गावठाण, नाशिक गावठाण, नाशिक रोड गावठाण, सातपूर गावठाण.

Jalakumbh in front of Mahakavi Kalidas Kalamandir.
Nashik Crime: मोबाईल अन स्मार्टवॉच जबरी लूट करणारे 3 चोरटे ताब्यात; अवघ्या 4 तासात लावला शोध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com