Nashik News : तब्बल दीड वर्षांपासून पाणी गळती; तक्रार करूनही अदखलपात्र

Nashik : दीड वर्षांपासून पाणी गळती होत असून महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार करून, प्रत्यक्ष फोन करूनदेखील दखल न घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
The water leakage has been going on for one and a half years
The water leakage has been going on for one and a half yearsesakal

Nashik News : प्रभाग ३१ मधील वासननगर कॉलनी भागात तब्बल दीड वर्षांपासून पाणी गळती होत असून महापालिकेकडे ऑनलाइन तक्रार करून, प्रत्यक्ष फोन करूनदेखील दखल न घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. येथील सर्वे क्रमांक ९११ मध्ये टोयोटा शोरूम मागच्या बाजूस साई रो- हाऊसेस समोर ही गळती सुरू आहे. सध्या या ठिकाणी एमजीएनएल गॅस पाइपलाइनचे काम झाले आहे. (nashik Water leakage for almost one and half years at wasan nagar colony marathi news)

मागील आठवड्यात रस्ते डांबरीकरणाचादेखील शुभारंभ झाला आहे. ही पाणी गळती अशीच राहिली तर भविष्यात ती वाढून डांबरीकरण केलेले रस्ते पुन्हा फोडावे लागण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी या गळतीला सुरवात झाली. त्या वेळी स्थानिक नागरिकांनी संबंधितांना कळवले. त्या वेळी कर्मचारीदेखील आले आणि तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली.

अवघ्या पंधरा दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पाणी गळती सुरू झाली, ती आजदेखील होत आहे. पुन्हा संबंधितांना कळविण्यात आले. ऑनलाइन तक्रारदेखील करण्यात आली. ती तक्रारदेखील परस्पर निकाली निघाली, असे दर्शविण्यात आले. दररोज येथे पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांनी अखेर ही तक्रार करणेदेखील सोडून दिले आहे. मात्र सध्या होणाऱ्या डांबरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिक चिंतेत आहेत.  (Latest Marathi News)

The water leakage has been going on for one and a half years
Nashik News : धुळवडीमुळे इंदिरानगरचे जॉगर्स त्रस्त; स्प्रिंकलर धूळखात

पाणीपुरवठा विभागाने ही दुरुस्ती तातडीने करून त्यानंतर डांबरीकरण करावे, अशी मागणी संजय म्हस्के, भिला गायकवाड, साहेबराव अहिरे, अनिल दहिया, योगराज परखल, रामकृष्ण गुरव, समाधान अभंग, बी. व्ही. पवार, किशोर साळुंखे, अशोक देवरे, नितीन वाजे, कैलास अग्रवाल, गोपाळ इलामे, सचिन विधाते, संतोष पवार आदींनी केली आहे.

''गेल्या दोन वर्षांपासून ही गळती होत आहे. गळतीचे नेमके कारण शोधून दुरुस्ती होणे गरजेचे आहे. अन्यथा डांबरीकरणदेखील वाया जाणार आहे. कोणी दखलच घेत नाही, त्यामुळे आता तक्रार करणेदेखील सोडून दिले आहे.''- संजय म्हस्के, स्थानिक नागरिक

The water leakage has been going on for one and a half years
Nashik News : जिल्ह्यातील 221 शस्त्रास्त्रे पोलिसांकडे होणार जमा : जिल्हाधिकारींचे आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com