Nashik Water Scarcity : मुदत उलटूनही ‘मजिप्रा’च्या पाणीयोजना अपूर्ण; आतापर्यंत केवळ 58 टक्के कामे पूर्ण

Water Scarcity : जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ४१६ गावांसाठी ३८ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केल्या आहेत.
Water Shortage
Water Shortageesakal

Nashik Water Scarcity : जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने ४१६ गावांसाठी ३८ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यातील सहा जुन्या योजनांचे विस्तारीकरण करण्यात येत असून, उर्वरित ३२ योजना नव्याने प्रस्तावित आहेत. या योजनांचे आतापर्यंत सरासरी ५८ टक्के काम पूर्ण झाले. या योजना पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ होती. मात्र, त्या योजना वेळेत पूर्ण न झाल्याने त्यांना मुदतवाढ दिली. (Even after deadline water scheme of Manipur is incomplete )

या योजना अपूर्ण असल्याने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविल्या जात असलेल्या गावांमध्येही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. केंद्र सरकारने जलजीवन मिशनची घोषणा करून ३१ मार्च २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाने शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यासाठी राज्यात जिल्हा परिषदांचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. (latest marathi news)

Water Shortage
Nashik Water Scarcity : टँकरची वर्षपूर्ती अन् टंचाईग्रस्त गावे-वाड्यांचे शतक! टॅंकरच्या रोज 118 खेपा

‘मजिप्रा’कडून जिल्ह्यात एक हजार ११७ कोटी रुपयांच्या निधीतून ४१६ गावांसाठी ३८ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या योजनांची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने जवळपास सर्वच योजनांना मुदतवाढ दिलेली आहे. ‘मजिप्रा’चे विस्तारीकरण केले जात असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याने संबंधित गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नवीन प्रादेशिक योजनांना शाश्वत जलस्रोत आहे.

मात्र, या योजना अपूर्ण असल्याने त्यांच्याद्वारे अद्याप पाणीपुरवठा केला जात नाही. या योजनांसाठी सरकार एक हजार ११७ कोटी रुपये खर्च करीत आहे. मात्र, या योजना वेळेवर पूर्ण न झाल्याने त्यांचा या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरची मागणी वाढत आहे. या सर्व योजना पूर्ण होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Water Shortage
Nashik Water Scarcity : जिल्ह्यात भीषण टंचाई! टॅंकरची संख्या 400, खर्च 63 कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com