esakal | नाशिक ठरणार 'शूटिंग डेस्टिनेशन’! चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणासाठी उत्तम पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

nashik city

(स्व.) दादासाहेब फाळके यांची पहिली कर्मभूमी ठरलेल्या नाशिकमध्ये चित्रीकरणासाठी अनेक निसर्गरम्य ठिकाणे उपलब्ध आहेत. परंतु, आता याचबरोबर पोलिस स्टेशन, लॉकअप रूम, कोर्ट असे सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने भविष्यात नाशिक शूटिंग डेस्टिनेशन’ ठरल्यास अतिशोयक्ती ठरू नये.

नाशिक ठरणार चित्रपट-मालिका चित्रीकरणासाठी उत्तम पर्याय

sakal_logo
By
दत्ता जाधव

नाशिक : (स्व.) दादासाहेब फाळके यांची पहिली कर्मभूमी ठरलेल्या नाशिकमध्ये चित्रीकरणासाठी अनेक निसर्गरम्य ठिकाणे उपलब्ध आहेत. परंतु, आता याचबरोबर पोलिस स्टेशन, लॉकअप रूम, कोर्ट असे सर्वकाही एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने भविष्यात नाशिक शूटिंग डेस्टिनेशन’ ठरल्यास अतिशोयक्ती ठरू नये. निर्माते दिग्दर्शकाची ही गरज ओळखून चित्रपट निर्माते शरदकुमार श्रीवास्तव यांनी स्टुडिओची उभारणी केली आहे. (Nashik-will-great-option-for-film-serials-nashik-marathi-news)

आता पुण्या-मुंबईत जाण्याची गरज नाही

स्व. मेहबूब खान यांच्या मदर इंडियापासून, दिलीप कुमारचा गंगा जमुना, दुलाल गुहा यांचा दुश्मन, नरसिंहा, नाना पाटेकरांचा प्रतिघात, पारस, प्रतिज्ञा आदी चित्रपटांचे बहुतांश चित्रीकरण नाशिक व परिसरात झाले आहे. या व्यतिरिक्त सध्या लोकप्रिय ठरलेल्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ सारख्या अनेक मालिकांच्या चित्रीकरणासाठी नाशिकची निवड झाली आहे. या ठिकाणी अनेक सुंदर ठिकाणे उपलब्ध असली तरी इनडोअर चित्रीकरणासाठी निर्माते दिग्दर्शकांना पुण्या- मुंबईवरच अवलंबून राहावे लागत असे. हीच गरज हेरत निर्माते शरदकुमार श्रीवास्तव यांनी खास इनडोअरसाठी स्टुडिओची उभारणी केली आहे. यासाठी त्यांना त्यांचे मित्र रफिक सय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सय्यद यांना ही कल्पना सुचल्यावर त्यांनी श्रीवास्तव यांना सांगितले. त्यांनी त्वरित त्याचा ध्यास घेत स्टुडिओची उभारणी केली आहे. याठिकाणी आता मराठी चित्रपट, मालिका यांच्यासाठी वाजवी दरात भाडेतत्वावर स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे. सध्या याठिकाणी पोलिस ठाणे, कस्टडी, न्यायालय असे सेट्स उपलब्ध असून भविष्यात विविध ऑफिसेस, रुग्णालये आदींचेही सेट उभारण्याचा मानस श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: 'ट्रॅजिडी किंग' दिलीप कुमारांचा नवाबी अंदाज

वाजवी दरात स्टुडिओ उपलब्ध

''मराठी चित्रपट, मालिकांसाठी स्टुडिओची कल्पना मित्र रफिक सय्यद यांनी सुचविली. आता या ठिकाणी वाजवी दरात स्टुडिओ उपलब्ध करून देण्यात येईल. भविष्यात हॉस्पिटल, वेगवेगळी कार्यालये एकाच जागी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.'' -शरदकुमार श्रीवास्तव, निर्माते

''नाशिकमध्ये चित्रपट, मालिका, वेब सिरीजच्या चित्रीकरणासाठी अनेक निसर्गरम्य ठिकाणे उपलब्ध आहेत. मात्र स्व. दादासाहेब फाळके यांच्या नगरीत स्टुडिओची कमतरता होती. हीच गरज ओळखून स्टुडिओची उभारणी केली आहे.'' -रफिक सय्यद, निर्मिती व्यवस्थापक

(Nashik-will-great-option-for-film-serials-nashik-marathi-news)

हेही वाचा: 'देवमाणूस' मालिकेतील सरू आजींच्या म्हणीवरून वाद; निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

loading image