esakal | 'देवमाणूस' मालिकेतील सरू आजींच्या म्हणीवरून वाद; निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

devmanus  serial

'देवमाणूस' मालिकेतील सरू आजींच्या म्हणीवरून वाद; निर्मात्यांनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'देवमाणूस' (devmanus) मधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमधील सरू आजीच्या वेगवेगळ्या म्हणी प्रेक्षक आवर्जून ऐकतात. पण सरू आजींच्या या म्हणींमुळे आता सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. सरू आजीच्या एका म्हणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सरू आजीने आक्षेपार्ह शब्द वापरला आहे असे नेटकऱ्यांचे मत आहे. (marathi serial devmanus controversy saru aaji video viral)

सरू आजींची म्हण

13 जुलैली प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या भागात सरू आजींनी 'आपलीच मोरी आणि अंघोळीला चोरी' या म्हणीमध्ये आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याचे नेटकऱ्यांचे मत आहे.

व्हिडीओबद्दल वाहिनीचे मत

झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर यांनी या व्हिडीओबद्दल सांगितले की, 'मालिकेतील सरू आजींच्या या संवादात कोणताही अश्लिल शब्द वापरला गेला नाही. या मालिकेची आणि वाहिनीची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा खोडकरपणा कोणी तरी केला आहे. मालिकेतील संवादात कोणताही आक्षेपार्ह शब्द येऊ नये म्हणून आमची एक वेगळी टीम काम करते. सरू आजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रूक्मिणी सुतार या साकारतात. त्या चुकूनही अशा प्रकारच्या शद्बांचा वापर करणार नाहीत.'

हेही वाचा: 'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?'; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर

हेही वाचा: "तिनं दिलेल्या पाचशेच्या नोटीनं नट झालो"

सरू आजींची भूमिका साकारणाऱ्या रूक्मिणी सुतार या ७० वर्षांच्या आहेत. मिसेस मुख्यमंत्री, लागीरं झालं जी, दुर्गा या मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

loading image