Latest Marathi News | बोचरी थंडी अन्‌ धुक्‍याची दुलई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter News

Nashik News : बोचरी थंडी अन्‌ धुक्‍याची दुलई

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांचा अनुभव नाशिककर घेत आहेत. पाऱ्यात घसरण होण्यासह शीतलहरींमुळे काही दिवस कडाक्‍याची थंडी जाणवत होती.

तर सध्या बोचऱ्या थंडीसह पहाटे व मध्यरात्री शहर परिसरात धुक्‍याची दुलई पसरलेली बघायला मिळत आहे. शनिवारी (ता. ७) नाशिकचे किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस नोंदविले आहे. (Nashik Winter Update Bitter cold and foggy all days nashik news)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

हेही वाचा: SAKAL Impact News : उद्यान स्वच्छता मोहीमेस सुरवात; कालिका उद्यानातील खेळण्यांचीही लवकरच होणार दुरुस्ती

यंदाच्‍या हिवाळ्यात मोजकेच दिवस गारठा जाणवला असला तरी सध्याचे वातावरण आरोग्‍याच्‍या दृष्टीने आव्‍हानात्‍मक बनले आहे. कधी कमालीचा गारठा तर कधी अत्‍यंत सामान्‍य वातावरण अनुभवायला मिळत आहे.

नववर्षाच्‍या पहिल्‍याच दिवशी १ जानेवारीला दहा अंशांपर्यंत किमान तापमान खालावले असताना, गेल्‍या काही दिवसांमध्ये कमाल तापमानात कमालीची घसरण झाली होती. शनिवारी (ता. ७) किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस तर कमाल तामपान २७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

वाऱ्याचा वेग अधिक राहात असल्‍याने बोचऱ्या थंडीची अनुभूती नागरिकांना येत आहे. त्‍यातच पहाटे व मध्यरात्रीच्‍या वेळेला शहरातील बहुतांश भागात धुक्‍याचे साम्राज्‍य बघायला मिळत आहे. सध्या मिश्र वातावरण राहात असून, येत्‍या काही दिवसांमध्ये थंडीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: Nashik News : 12 वर्षीय बालकाच्या अपहरण प्रकरणातील चौथा संशयित गजाआड