Women's Day Special : गुणवत्तेच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या मनात पेटविल्या ‘ज्योती’

Women's Day Special : भविष्यवेधी शिक्षणातून विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी शिवडे (ता. सिन्नर) येथील मॉडेल स्कूल मानांकित जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ज्योती कदम नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात ‘ज्योती’ पेटविण्याचे काम करीत आहेत.
Women's Day Special
Women's Day SpecialSakal

Women's Day Special : भविष्यवेधी शिक्षणातून विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी शिवडे (ता. सिन्नर) येथील मॉडेल स्कूल मानांकित जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ज्योती कदम नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात ‘ज्योती’ पेटविण्याचे काम करीत आहेत. मॉडेल स्कूल प्रकल्पात शिवडे शाळेचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि गुणात्मक विकासासाठी शाळेत आर्ट क्लब, रिडींग, स्पोर्ट, असे विविध क्लब स्थापन करण्यात आले आहेत. (nashik Women Day Special Flame lit in minds of students for quality development marathi news)

‘योगा’, ‘विद्यार्थी आव्हान’, ‘सेल्फी विथ सक्सेस’, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर’, ‘संगीतमय परिपाठ’, असे विविध उपक्रम राबविण्यात श्रीमती कदम यांचा पुढाकार आहे. शाळेत इंग्रजी माध्यमाप्रमाणेच चार कलरचे हाऊस निर्माण केले आहेत. चारही हाऊसचे कॅप्टन, व्हाइस कॅप्टन यांची निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली.

नोकरीची प्रारंभीची १३ वर्षे इगतपुरी तालुक्यात कदम यांनी सेवा बजावली. मे २०१८ पासून शिवडे येथील जिल्हा परिषद शाळेत त्या कार्यरत आहे. २०१६ मध्ये बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांना प्राथमिक शिक्षक गटातून पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. २०१८-१९मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या राज्यस्तरीय शिक्षणवारी उपक्रमात ‘किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि शिक्षण’ या साहित्य मांडणीची निवड झाली.

अधिकारी, शिक्षक, लोकप्रतिनिधींनी स्टॉलला भेट देऊन कौतुक केले. फेब्रुवारी २०१९ मध्ये इव्हीएम मशीनद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक शाळेत झाली. प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया, निवडणुकीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमाचा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला. (latest marathi news)

Women's Day Special
Women's Day Special : गिफ्ट द्यायचंय? आई, बहीण, बायको आणि मुलीसाठी हे आहेत 'गिफ्ट ऑप्शन'!

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते देण्यात आला.

शाळेतील ‘माझी गोष्ट माझे पुस्तक’ या उपक्रमातून मुलांच्या गोष्टींची पुस्तके तयार करून त्यांचे प्रकाशन मुलांनीच केले. पुस्तकनिर्मितीचा प्रवास या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळाला. या उपक्रमाचा राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला. मुलांच्या मदतीने गावाची संपूर्ण माहिती मिळवून ‘माझा गाव, माझा अभिमान’ या माहितीची पुस्तिका तयार करण्यात आली.

त्यात गावाचे स्थान, विस्तार, सीमा, गावाची प्राकृतिक रचना, नैसर्गिक साधनसंपत्ती, लोकसंख्या, व्यापार, दळणवळण, विविध संस्था, शाळा, ग्रामपंचायत ही सर्व माहिती आहे. पत्रलेखन उपक्रमांतर्गत महिला दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईला पोस्टकार्डवर पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होत्या.

Women's Day Special
Women Day Special: शिवडीत तरुणी चालवते ‘क्लाऊड किचन’; आवड बनले करिअर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com