Jal Jeevan Mission : `जलजीवन’ची कामे रेंगाळली; 112 पैकी केवळ 37 पूर्ण

Jal Jeevan Mission : ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळकनेक्शन व्हावे म्हणून केंद्राने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत बागलाण तालुक्यात कामे संथगतीने सुरू आहेत.
Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal

Jal Jeevan Mission : ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळकनेक्शन व्हावे म्हणून केंद्राने सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत बागलाण तालुक्यात कामे संथगतीने सुरू आहेत. १२२ पैकी ५३ गावातील कामे प्रलंबित राहणार असल्याने यंदाही या गावांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे समोर आले आहे. यामुळे या गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. (nashik work of Jal Jeevan is delay marathi news)

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला तालुक्यात घरघर लागली आहे. २०२०-२१ व २०२२ -२३ अशा दोन टप्यात जलजीवनची कामे मंजूर झाली असून १८ ते २२ महिन्यात योजनेची सर्व कामे पूर्ण करून द्यायची ठेकेदारांना अट होती. मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या मजूर संस्थांवर दंडात्मक कारवाईची निर्देशही शासनाने दिले होते.

मात्र मुदत संपूनही बागलाण तालुक्यात अनेक गावात जलजीवनची कामे आजही संथ गतीने सुरू आहेत. बागलाण तालुक्यातील ११२ गावांचा जलजीवन मिशन योजनेत समावेश होता. २०२२ मध्ये ही कामे मंजूर होऊन मार्च २०२४ पर्यंत या योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्याचे उदिष्ट होते.

मात्र तालुक्यात ११२ पैकी फक्त ३७ गावांची कामे पूर्ण झाली असून ७५ गावांतील योजनेची ५० टक्के कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. ७५ पैकी येत्या जूनअखेर २२ योजना पूर्ण होणार असल्याचा दावा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. ५३ गावातील ५० टक्के कामे प्रलंबित राहतील म्हणून या गावांना पुन्हा पाणी समस्येला सामोरे जाण्याची नामुष्की येणार आहे.  (latest marathi news)

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामांना 6 महिन्यांची मुदतवाढ

जलकुंभाचा वाद विकोपाला

वाठोडा कोरोबानगर व गांधीनगर या गृप ग्रामपंचायत असलेल्या तिन्ही गावात जलजीवन योजनेच्या जलकुंभाच्या जागेवरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. योजनेचा मुख्य जलकुंभ आपल्याच गावात व्हावा यासाठी वाद सुरु असून हा वाद न मिटल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दोन्ही गटांकडून तालुका प्रशासनास प्रशासनास देण्यात आला आहे.

''तालुक्यातील जलजीवनची कामे मार्च २०२४ अखेर पूर्ण करण्याचे उदिष्ट होते. मात्र वेळेत कामे झाली नाहीत. आठ गावांची कामे वनविभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे लांबली आहेत. यापैकी जूनअखेर २२ कामे पूर्ण होतील. मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार की मुदतवाढ मिळणार हा निर्णय वरिष्ठ अधिकारी घेतील.''- राकेश आहिरे, प्रभारी उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, बागलाण.

''तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामात अनियमितता असून कागदोपत्री कामे दाखवून निधी हडप करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. अनेक ठिकाणी विहीर खोदकाम अपूर्ण असतानाही पाइपलाईन व जलकुंभ बांधून मार्च अखेरची बिले काढण्यात येत आहेत. अनेक गावांत टँकर सुरु करण्यात आलेले आहेत. जिथे टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे, त्या गावातून नजीकच्या गावासाठी जलजीवन योजनेची विहीर खोदण्याचा जावईशोध लावण्यात आला आहे.''- राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या 103 योजनांना मिळेना वीजजोडणी; वीजबिल थकल्याने पाणीपुरवठा ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com