World Consumer Day : प्रत्येकाने ‘टेक्नोसॅव्ही’ असणे काळाची गरज; व्यवहार करताना ज्येष्ठांना भीती

World Consumer Day : इंटरनेटशी संबंधित सुविधांचा वापर भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने टेक्नोसॅव्ही असणे काळाची गरज होणार आहे.
techno savvy
techno savvy esakal

World Consumer Day : इंटरनेटशी संबंधित सुविधांचा वापर भविष्यात वाढतच जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने टेक्नोसॅव्ही असणे काळाची गरज होणार आहे. वीजबिल भरणे असो वा टीव्ही- मोबाईलचे रिचार्ज किंवा पैसे ट्रान्स्फर करणे असो, या कामांसाठी घराबाहेर जाण्याची गरज पडत नाही. मोबाईलच्या एका क्लीकवर हे व्यवहार करता येतात, परंतु याच सुविधांचा वापर करताना ज्येष्ठ नागरिकांना भितीपोटी दुप्पट कष्ट घ्यावे लागतात. (nashik World Consumer Day Need of hour for everyone to be techno savvy marathi news )

नाहीतर इतरांवर अवलंबून राहावे लागते. यंदाची जागतिक ग्राहक दिनाची थीम ग्राहकांसाठी योग्य आणि जबाबदार एआय असून ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन व्यवहारात सहभागी करून घेतल्यास ग्राहक दिनाचा हेतू यानिमित्त सफल होईल. आज प्रत्येक बँकेची स्वतःची स्वतंत्र वेबसाइट आणि ॲप्लिकेशन असतात. त्यासाठी बँकेत जाण्याची कसरत करावी लागत नाही. परंतु, ज्येष्ठांना आजही बँकेत जाऊन रांगेत उभे राहावे लागते.

काही ज्येष्ठ फसविले जातात. आज प्रत्येक तरुणाच्या हातात मोबाईल आहे. त्यांचा स्क्रीनशी अधिक संबंध असल्याने ऑनलाइन व्यवहाराबाबत सांगण्याची गरज पडत नाही. परंतु, वयाच्या साठीनंतर कोणतेही प्रशिक्षण न घेता थेट हातात थेट मोबाईल घेतला तर तंत्रज्ञानाचा वापर करताच येणार नाही. त्यामुळे ऑनलाइन सुविधांचा ग्राहक म्हणून लाभ ज्येष्ठ नागरिकांना घेता येत नाही. शिवाय तेच, तेच प्रश्न विचारल्यास कुणी ओरडल्यास त्यांना ते अपमानास्पद वाटते.

कोणत्या अडचणी येतात?

वय वाढते तशी संवेदनशीलता, हालचाल आणि नजर कमजोर झाल्याने दुसऱ्याच ऑप्शनवर क्लिक होवू शकते. ऑनलाइन व्यवहार करताना काही सेकंदात ओटीपी (वन टाइम पासवर्ड) टाकावा लागतो नाही तर, ट्रान्झेक्शन रद्द होते. यासाठी क्विक ॲक्शन म्हणजेच पटकन निर्णय घ्यावा लागतो. ज्येष्ठ पटकन निर्णय घेण्यात कमी पडल्याने त्यांचा गोंधळ उडतो. ( latest marathi news )

techno savvy
World Consumer Day : ग्राहकाला मिळालेले 6 हक्क कोणते? जाणून घ्या सविस्तर

शिवाय मीडियात सतत सतर्क राहण्याची माहिती येत असल्याने ऑनलाइन व्यवहार करताना भीती असते. बँकेत हेल्प डेस्कची मदत घेणे म्हणजे ग्राहकांचा अंत असतो. बँकेतील कर्मचारीही ज्येष्ठांना वैतागतात.

काय करता येवू शकते

इंटरनेट बँकिग कसे वापरावे याबद्दल संपूर्ण माहिती बँकेतून, घरातील सदस्यांकडून किंवा हल्ली बँकेचे अधिकृत यू- ट्यूब चॅनेल असतात, त्यावरून घेता येवू शकते. ज्या बँकेतून व्यवहार करायचा त्यामध्ये कमीत- कमी रक्कम ठेवावी म्हणजे रिस्क कमी होते. इंटरनेटवर नामांकित बँकाच्या फेक वेबसाइट असतात त्यासाठी बँकेची ऑफिशियल वेबसाइट बँकेतून कन्फर्म करून घ्यावी. कॅशपेक्षा ऑनलाइन व्यवहारात सवलती मिळाल्याने त्याचा लाभ घेता येतो.

''सॉफ्टवेअर तयार करताना ते ग्राहकांना वापरायला सोपे जाईल, याच पद्धतीने विकसित केले जातात. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना आधी पूर्णपणे समजून घ्यावा, मगच त्याचा वापर करावा. ज्येष्ठांनी शक्यतो ऑनलाइन व्यवहार करताना मोबाईलचा वापर न करता डेस्कटॉपचा वापर करावा.''- भाग्यश्री केंगे, वेब संचालिका

''भाजी घेतल्यावर भाजीवाले आता क्यूआरकोड पुढे करतो पण ते सर्वांनाच जमत नाही. पैसे ट्रान्स्फर करताना ते भलतीकडेच गेले तर मिळविणे फार अवघड असते. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना मनात भीतीच असते. त्यासाठी पुढील आठवड्यात मंडळातील सदस्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.''- डॉ. शरद पाटील, अध्यक्ष, प्रौढ नागरिक मित्रमंडळ

techno savvy
World Consumer Day : जागतिक ग्राहक हक्क दिन फसवणूक रोखण्यासाठी आवश्‍यक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com