नाशिक : वर्षभरात गुन्हेगारीत पाचशेची घट

बलात्‍कार मात्र वाढले; दोन वर्षांत दीड हजार गुन्हे कमी
crime
crime sakal

नाशिक : गेल्या चार वर्षांच्या तुलनेत एकूण गुन्हेगारी दीड हजाराने घटली आहे. महिलांच्या टवाळखोरीच्या घटना बंद झाल्या असताना बलात्काराच्या गुन्ह्यात मात्र वाढ झाली आहे. विक्रमी अशा १०८ जणांवर मोक्का कारवाया हा राज्यात चर्चेचा विषय राहिला.

crime
जळगाव : साडेतीन लाखांच्‍यावर मुलांना होणार लसीकरण

मोक्का, हद्दपाऱ्या, भूमाफिया टोळ्यांवर कारवाईमुळे नाशिक पोलिस चर्चेत राहिले तसे राजकीय पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची चर्चा झाली. सामाजिक संघटनांना आंदोलन, मोर्चे काढायला पोलिस परवानगी मिळत नाही, हा वर्षभर पोलिसांवर आरोप होत राहिला. गेल्या चार वर्षांतील एकूण गुन्हेगारी घटनांच्या संख्यात्मक आढावा बघता, २०१८ (३७३५), २०१९ (४०६०) २०२० (३२३५), तर यंदा २०२१ मध्ये ही

संख्या दोन हजार ५७५ इतकी घटली आहे.

खुनाची सरासरी नाशिक शहरात महिन्याला किमान दोन ते कमाल तीन खूनविषयक गुन्हेगारीची वार्षिक सरासरी आहे. वार्षिक ३६ पेक्षा अधिक खुनांची संख्या वाढली, तर गुन्हेगारीचा आलेख वाढला हे प्रमाण आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन खून अधिक झाले मात्र वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे कमीच आहे.

crime
नागपूर शहरात ओमिक्रॉनबाधित महिला

राजकीय नेत्यांवर गुन्हे

वर्षभरात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. परवानगी न घेता पोस्टर लावणे, तसेच मेळावे घेतल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विनापरवानगी आंदोलनावरून गुन्हे दाखल झाले तर पोलिस ठाण्यात आंदोलन केल्याप्रकरणी आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करताना थेट त्यांच्या शहराध्यक्षांना समज देण्यात आली. त्यामुळे राजकीय पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर राहिले.

टवाळखोरी बंद, बलात्कार वाढले

शहरात महिलांच्या टवाळखोरीच्या घटनांत मागील दोन वर्षांत प्रमाण मोठे होते. मात्र यंदाच्या वर्षी त्यात लक्षणीय घट झाली आहे. साध्या वेशातील महिला पोलिसांचे पथक नेमून टवाळखोरांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमामुळे टवाळखोरी बंद झाली असली, तरी वर्षभरात बलात्काराच्या घटनांत मात्र वाढ झाली आहे. ५४ ते ५८ या सरासरी असलेल्या बलात्काराच्या घटनांत वाढ होऊन या वर्षी ६५ पर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत.

crime
जळगाव : ओमिक्रॉनचा वाढता धोका; जळगावात गर्दीला प्रतिबंध

"गेल्या चार वर्षांच्या तुलनेत शहरातील गुन्हेगारी कमी झाली आहे. मागील वर्षातील कोरोना लॉकडाउनमुळे गुन्हेगारीचे प्रमाण राज्यभर कमी राहिले. मात्र यंदा लॉकडाउन प्रतिबंध शिथिल झाल्यानंतर राज्यात सगळ्या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असताना नाशिक शहरात मात्र गुन्हेगारीचा आलेख कमीच आहे."

- दीपक पांडे, पोलिस आयुक्त, नाशिक

  • गुन्ह्याचा प्रकार - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१

  • खून - ३५ - २४ - २५ - २८

  • खुनाचा प्रयत्न - ५० - ७३ - ५० - ४०

  • बलात्कार - ५४ - ५८ - ५७ - ६५ (वाढ)

  • दरोडे - १० - १७ - ११ - १२

  • दरोड्याचा प्रयत्न - ०४ - ०६ - ०४ - ०२

  • चेन स्नॅचिंग - ७७ - ९४ - ९८ - ६५

  • मोटार वाहन चोरी - ५६९ - ५०५ - ४१७ - ४६०

  • मारामाऱ्या - ८३ - ८२ - ७१ - ५७

  • फसवणूक - २४२ - २८० - २१० - ११५

  • अपहरण - २६५ - २८२ -२०० - १९९

  • एकूण गुन्हे - ३७३५ -- ४०६० -- ३२३५ -- २५७५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com