School Uniform : मोफत गणवेशाच्या शिलाईसाठी मिळणार फक्त 110 रुपये; गोंधळ संपेना

Nashik News : शाळा सुरू होण्यासाठी अवघा पाच दिवसांचा कालावधी उरला असताना समग्र शिक्षा अभियान अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत गणेशाचे गुऱ्हाळ मात्र अजून थांबलेले नाही.
free School uniform given under Shiksha Abhiyan Abhiyan
free School uniform given under Shiksha Abhiyan Abhiyanesakal

येवला : शाळा सुरू होण्यासाठी अवघा पाच दिवसांचा कालावधी उरला असताना समग्र शिक्षा अभियान अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत गणेशाचे गुऱ्हाळ मात्र अजून थांबलेले नाही. यामुळे पहिल्या दिवशी गणवेश ही घोषणा हवेतच विरण्याची शक्यता आहे. नव्याने आदेश काढत शासनाने गणवेशाचे नियमित व स्काऊट गाईड असे दोन गणवेश देण्याचे निश्चित केले असून नियमित गणवेशाची शिलाई बचत गटामार्फत सुरू आहे. (free School uniform given under Shiksha Abhiyan Abhiyan)

तर स्काऊट गाईडचा गणवेश शाळा स्तरावरच मिळणार असून यासाठी कापड देऊन शालेय समितीला फक्त ११० रुपये शिलाईसाठी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते आठवीच्या शाळांमधील सर्व मुली तसेच अनुसूचित जाती -जमाती व दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो.

यावर्षी गणवेशाचे स्वरूप बदलून एक राज्य, एक गणवेश असावा यासाठी शासनाने यापूर्वीच स्काऊट गाईडच्या गणवेशाप्रमाणे निळ्या कलरची निवड केली. मात्र त्यातही बदल करीत नियमित गणवेश व स्काऊट- गाईडचा गणवेश असे दोन भाग केले. पहिली ते चौथीच्या मुलींसाठी आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक तर स्काऊट गाईडसाठी गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक दिला जाईल.

पाचवीच्या मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट व लढत निळ्या रंगाचा स्कर्ट असेल. पहिली ते सातवीच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट नियमित गणवेशासाठी तर स्काउट गाईडसाठी स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट दिली देण्यात येईल तर आठवीच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट नियमित गणवेशाला तर स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट स्काऊट गणवेशाला दिली जाईल. (latest marathi news)

free School uniform given under Shiksha Abhiyan Abhiyan
Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराचा ‘निर्मल वारी’ला फटका; साडेपाच कोटींचा प्रस्ताव रद्द होण्याची शक्यता

सहावी ते आठवीच्या मुलींसाठी आकाशी निळ्या रंगाची कमीज,निळ्या गडद रंगाची सलवार व निळा रंगाची ओढणी तर स्काऊटसाठी गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज,गडद निळ्या सलवार व ओढणी देण्यात येणार आहे.

गणवेशाचे वार

सोमवार, बुधवार व शुक्रवारी नियमित गणवेश असेल तर मंगळवार,गुरुवार व शनिवारी स्काऊट गाईडचा गणवेश धारण करून या दिवशी या विषयाच्या तासिका देखील घेतल्या जातील.

नियमित गणवेशाचे काम सुरू

नियमित गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू आहे तर दुसऱ्या स्काऊट गाईड गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीला कापड देण्यात येणार असून त्यासाठी ११० रुपये शिलाई शाळा व्यवस्थापन समितीला राज्य प्राथमिक शिक्षक परिषद यांनी यांच्याकडून वर्ग होणार आहे.

म्हणजेच शाळा स्तरावर एक गणवेश घ्यावा लागणार आहे.पुरुषांच्या गणवेशाची शिलाई सध्या ४०० ते ६०० रुपये झाली आहे. महागाईत शंभर रुपयात गणवेश शिलाई होईल का हा प्रश्न आता पडला आहे.या सर्व गोंधळात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवा गणवेश मिळण्याची शक्यता कमीच दिसते.

free School uniform given under Shiksha Abhiyan Abhiyan
Nashik ZP News : ग्रामसेवकांच्या आंदोलनाबाबत जिल्हा परिषद प्रशासन अंधारात; आज होणाऱ्या बैठकीकडे ग्रामसेवकांचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com