Nashik: खरीपात हक्काच्या मका, कांद्यावरच येवलेकरांचा विश्वास! कपाशीसह कडधान्यात मोठी घट होणार; सलामीच्या पावसाने पेरणीची लगबग सुरू

Nashik Agriculture News : यावर्षी कपाशीसह कडधान्याच्या व बाजरीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची चिन्हे दिसत आहे.
Sowing
Sowingesakal

येवला : शाश्वत आणि उत्पन्न देणारे पीक म्हणून मका अन काही झाले तरी हक्काचे दोन रुपये देणारे पीक म्हणून कांद्याकडे यावर्षी शेतकऱ्यांचा कल आहे. सुरुवातीलाच पावसाने चांगली सलामी दिल्याने तालुक्यात खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली असून अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीच्या दृष्टीने मुगाची पेरणी केली आहे. यावर्षी कपाशीसह कडधान्याच्या व बाजरीच्या क्षेत्रात मोठी घट होण्याची चिन्हे दिसत आहे. (Nashik yeola people faith in Kharif Maize Onion crop)

राज्यातील ९४ दुष्काळी तालुक्याच्या यादीत येवल्याचे नाव अग्रभागी असते. त्यामुळे चांगला पाऊस पडला तरच येथे खरीप व रब्बीची शाश्वती असते अन्यथा पाऊस कमी झाल्यास खरीपही धोक्यात सापडतो, हेच चित्र मागच्या वर्षी दिसून आले आहे. अल्प पावसामुळे खरीप पूर्ण मातीत गेला होता.

यावर्षी चांगल्या पावसाचे भविष्य वर्तविले असून गेल्या दोन-चार दिवसात तालुक्याच्या अनेक गावात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना खरीपासाठी शुभ संकेत मिळाल्याचे दिसते. तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र मका व लाल कांद्याखाली गुंतविले जाते. यावर्षीही मकाचा भाव दोन हजारांवर गेल्याने शेतकऱ्यांना कल मकाकडे आहे.

जोडीलाच कांद्याच्या दरातही तेजी असल्याने अन्‌ लाल कांद्याला भाव मिळतोच म्हणून त्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. लाल कांदा पोळ्याच्या दरम्यान लागवड होत असल्याने त्या क्षेत्रात मुगाचे पीक घेऊन कांदा लागवड करण्यासाठी आत्ताच मुगाची पेरणी सुरू झाली आहे. काही भागात मका लागवडीची तयारी झाल्याचे दिसते.

मागील चार-पाच वर्षात तालुक्यात मकाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून जिल्ह्यात नंबर एकवर येथे मका घेतला जाते.यावर्षीही मकासह स्थिर भाव राहणाऱ्या सोयाबीनचे क्षेत्र वाढते राहील. कपाशीचे उत्पन्न व भाव बेभरवशाचे झाल्याने कपाशीचे क्षेत्र घटणार असून कडधान्य, तेलबिया व बाजरीच्या क्षेत्रात यंदाही घट होऊ शकेल.

तालुक्यातील शेतकरी नगदी भाजीपाल्याकडे वळत आहेत. मागील वर्षी तालुक्यात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. मात्र सुरुवातीला मिळणाऱ्या भावामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवडीसाठी शेतकऱ्यांनी रोपांची नोंदणी केली आहे. मागील दोन-तीन वर्षी लाल कांद्याला तेजी राहिल्याने यावर्षी शेतकरी लाल कांदे लागवडीला प्राधान्य देणार असल्याचे दिसत आहे.

मात्र पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी आगात टोमॅटो लागवडही केली आहे.तालुक्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५४ हजार २३३ हेक्टरवर असून यात वाढ होत ७५ हजार ४०० हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामावर पुढील समीकरणे अवलंबून असल्याने पावसाला प्रारंभ होताच पेरणीची लगबग सुरू झाली आहे. तालुक्यात मका, मुग, सोयाबीन, कापूस, भुईमुग, तुर, उडीद आदी पिकांची खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे. (latest marathi news)

Sowing
Nashik Agriculture News : नव्या तंत्रामुळे भात लागवडीच्या क्षेत्रात होणार वाढ!

अशी होईल खरीपाची पेरणी..

पीक - सर्वसाधारण क्षेत्र - प्रस्तावित क्षेत्र

ज्वारी - ४ - ००

बाजरी - ९७३० - ५२००

मका - ३५११९ - ४१४००

तूर - ११२८ - २००

मूग - ५२४० - ९३००

उडीद - ५२५ - - ०

भुईमुग - २६१४ - १४००

सोयाबीन - ४७१२ - १६८००

कापूस - ११०३९ - ११००

ऊस - १९८ - ७०

एकूण - ७०१११ - ७५४००

"सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरणी वेगात सुरू आहे. विशेषत: मका, मूग, सोयाबीनची पेरणी तालुक्यात सुरू आहे. कमी जास्त प्रमाणात पाऊस असून शेतकऱ्यांनी पुरेशी ओल पाहूनच पेरणी करावी.अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा."

- शुभम बेरड, तालुका कृषी अधिकारी,येवला

"येवला तालुक्यातील काही गावात पावसाने हजेरी लावली असून आमच्या परिसरात खरीपाच्या पेरणीयोग्य पाऊस अद्याप झालेला नाही. पेरणीची पूर्वतयारी झाली असून मका,सोयाबीनचे क्षेत्र वाढेल. कांदा लागवडीचे नियोजन आहे. मागील वर्ष वाया गेले आहे.आता या वर्षी तरी निसर्गाने साथ द्यायला हवी."- सुदाम मढवई, शेतकरी, चिंचोडी

Sowing
Nashik News : दिंडोरीत गतवर्षापेक्षा यंदा सोयाबीनने घेतली आघाडी! तालुक्यात 22706. 40 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दीष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com