Nashik News : तरुण महिला डॉक्टरने नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

Nashik : इंदिरानगर परिसरात आई-वडिलांसमवेत राहणाऱ्या ३० वर्षीय महिला डॉक्टरने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याचा प्रकार घडला आहे.
Death
Deathesakal

नाशिक : इंदिरानगर परिसरात आई-वडिलांसमवेत राहणाऱ्या ३० वर्षीय महिला डॉक्टरने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. डॉ. विद्याश्री अक्षय शिंदे (३०, रा. अथर्व साई रो हाऊस, शिव कॉलनी, इंदिरानगर) असे मयत महिला डॉक्टरचे नाव आहे. (Nashik Young female doctor took extreme step marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. विद्याश्री यांनी रविवारी (ता. ३१) राहत्या घरामध्ये छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Death
Nashik Crime News : गंगाघाटावरून भरदिवसा 2 दुचाक्या चोरीला! शहरात दुचाक्या चोरट्यांचा पुन्हा सुळसुळाट

डॉ. विद्यार्श्री या बीएमएमएस पदवीधारक असून, एक-दीड वर्षापासून त्या घरीच होत्या. त्यांचा विवाह अक्षय शिंदे याच्याशी झाला होता. परंतु त्यांच्यात वाद असल्याने न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे सध्या त्या वडील राजेंद्रप्रसाद मारवाडी यांच्याकडेच राहत होत्या. मात्र याच नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदरील प्रकरणाची चौकशी पोलीस हवालदार कैलास जाधव हे करीत आहेत.

''कौठुंबिक नैराश्यातून डॉ. विद्याश्री यांनी आत्महत्त्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. डॉ. विद्याश्री यांच्या मोबाईलमधील तांत्रिक माहितीच्या आधारे तपासली जाईल. तसेच, सासरकडील मंडळीचीही चौकशी केली जाईल.''- अशोक शरमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इंदिरानगर

Death
Nashik Crime News : वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघींवर अत्याचार; लग्नाचे दाखविले आमिष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com