Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेत ‘भाऊ’ही सहभागी; नाशिक जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
Male Employees Illegally Benefit from Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरप्रकारे लाभ घेतल्याप्रकरणी नाशिक जिल्हा परिषदेतील आठ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे
नाशिक: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये जिल्हा परिषदेतील आठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दोन पुरुषांनीही या योजनेत आपले ‘हात धुवून’ घेतल्याचे उघडकीस आल्याने आता एकच खळबळ उडाली आहे.