Nashik ZP School : जिल्हा परिषद शाळा शिवडे जिल्ह्यात प्रथम; मिशन मॉडेल स्कूल

ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मिशन मॉडेल स्कूल उपक्रम सुरु असून त्या अंतर्गत झालेल्या जिल्हा व तालुकास्तरीय स्पर्धेत शिवडे जिल्हा परिषद शाळेने पहिला क्रमांक पटकावला आहे.
ZP School
ZP Schoolesakal

Nashik ZP School : जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मिशन मॉडेल स्कूल उपक्रम सुरु असून त्या अंतर्गत झालेल्या जिल्हा व तालुकास्तरीय स्पर्धेत शिवडे जिल्हा परिषद शाळेने पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रत्येक तालुक्यातून दोन याप्रमाणे ३० शाळांना तालुकास्तरावरील पुरस्कार जाहीर झाले आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने सन २०२३-२४ वर्षात जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मिशन मॉडेल स्कूल उपक्रम सुरु आला आहे. (nashik Zilla Parishad School marathi news)

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांची पाहिल्या टप्यांत निवड करण्यात आली होती. या शाळांमध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, भविष्यवेधी शिक्षण विचार प्रशिक्षण अंमलबजावणी, मॉडेल स्कूलमधील उपक्रमांची कार्यवाही, मनरेगा अंतर्गत कामे, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर वर्षभर विविध कामे व उपक्रम राबविण्यात आले. त्या आधारे या शाळांचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन करण्यात आले.

मुल्यांकनाचे विश्लेषण करण्यासाठी ४ सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या मूल्यांकन समितीने मुल्यांकनाच्या आधारे विश्लेषण करून उत्कृष्ट काम करणाऱ्या मॉडेल स्कूलची गुणवत्तेवर आधारित जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय ‘जिल्हा परिषद आदर्श शाळा’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.

ह्या शाळांना प्रोत्साहन मिळावे तसेच शाळांनी एकमेकांशी निकोप स्पर्धा करून जिल्हा परिषद शाळांचा सर्वांगिण विकास व्हावा, तसेच पुरस्कार रूपाने प्राप्त रक्कमेचा जिल्हा परिषद शाळांच्या गरजा भागविल्या जाव्यात यासाठी जि.प.सेस निधीतून या शाळांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. (latest marathi news)

ZP School
Nashik ZP School : येवला मतदारसंघातील जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटींचा निधी

जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शाळा

प्रथम : जि. प. शाळा शिवडे (ता. सिन्नर)

द्वितीय : वाजपेयी इंटरनेशनल स्कूल (भोयेगाव ता.चांदवड)

तृतीय : जि. प. शाळा जऊळके दिंडोरी (ता. दिंडोरी)

उत्तेजनार्थ : जि. प. शाळा मोडाळे (ता. इगतपुरी)

तालुकास्तरीय पुरस्कार प्राप्त शाळा

ZP School
ZP School Teacher Payment: जि. प. च्या 6 हजारांवर शिक्षकांना 31 तारखेलाच वेतन

तालुका प्रथम द्वितीय

इगतपुरी जि.प.शाळा वाडीवऱ्हे जि.प.शाळा भावली खुर्द

कळवण जि.प. शाळा भेंडी, जि.प. शाळा गणोरे

चांदवड जि.प.शाळा मंगरूळ, जि.प. शाळा कुंडलगाव

त्र्यंबकेश्वर जि.प. शाळा वाघेरा, जि.प.शाळा ठाणापाडा

दिंडोरी जि.प. शाळा अहिवंतवाडी जि.प.शाळा विळवंडी

देवळा - जि.प. विद्यानिकेतनशाळा जि.प. शाळा रामनगर

नांदगाव जि.प.शाळा साकोरे जि.प. शाळा नांदूर

नाशिक - जि.प. शाळा विल्होळी जि.प. शाळा मातोरी

ZP School
Nashik ZP School: संतप्त पालकांनी लावले शाळेला कुलूप; शिक्षकांनी बाहेरच भरविली शाळा

निफाड - जि.प. शाळा कारसूळ जि.प.शाळा खडकमाळेगाव

पेठ - जि.प. शाळा दोनवाडे। जि.प. शाळा जळे

बागलाण - जि.प. शाळा नवेरातीर जि.प. शाळा वायगांव

मालेगाव - जि.प. शाळा साजवहाळ जि.प. शाळा पाटणे

येवला जि.प. शाळा उंदीरवाडी जि.प. शाळा राजापूर

सिन्नर जि.प. शाळा पांगरीबुद्रुक जि.प. शाळा मुसळगाव

सुरगाणा जि.प. शाळा अंबाठा जि.प. शाळा करवंदे

ZP School
Nashik ZP School : येवला मतदारसंघातील जि. प. शाळांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटींचा निधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com