Villagers Catch Three Theft Suspects in Dindori : खतवड येथे चोरीच्या संशयावरून तिघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर उपचाराआधीच ते पसार झाले.
नाशिक- खतवड येथे चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी तिघांना बेदम मारहाण करीत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच रुग्णालयाच्या आवारातून तिघे पसार झाल्याचा प्रकार घडला.