#Coronafighter : नाशिकची अनुजा अमेरिकेत राबवतेय 'असा' उपक्रम..सर्वत्र होतेय कौतुक!

anuja corona fighter.png
anuja corona fighter.png

नाशिक : कोरोनाच्या विषाणूने जगभर थैमान घातले आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समाजातील विविध घटक पुढे येऊन आपले योगदान देतानाचे चित्रही दिसत आहे. अमेरिकेत राहणारी आणि मूळची नाशिकची असलेली अनुजा कुलकर्णी हिने देखील आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवत घरीच मास्क बनविणे सुरू केले. आतापर्यंत तिने तेथील हॉस्पिटलमध्ये सहाशेपेक्षा जास्त मास्क मोफत वाटले आहेत. 

सर्वांकडून होतेय अनुजाच्या उपक्रमाचे कौतुक 
नाशिक येथील अनुजा कुलकर्णी ही अमेरिकेच्या बोस्टन भागात राहते. सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ती काम करते. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिचे घरूनच काम सुरू आहे. तिच्या घराच्या जवळच असलेल्या शाळेचे रूपांतर रुग्णालयात झाले आहे. बोस्टन शहरात मास्क आणि सॅनिटायझरची खूप कमतरता जाणवत होती म्हणून तिने येथील भारतीय महिलांच्या मदतीने घरीच मास्क बनविण्याचे ठरविले. या कामासाठी तेथील एका कापड व्यावसायिकाने कापडही पुरविले. घरी ते एका विशिष्ट आकारात कापून मशिनवर शिवण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत वीस रुग्णालयांमध्ये सुमारे सहाशेपेक्षा जास्त मास्कचे वाटप करण्यात आले आहे. हे मास्क कापडी असल्याने स्वच्छ धुऊन पुन्हा वापरता येणे शक्‍य असल्याने सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com