Latest Marathi News | Navratri 2022 : कालिकामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kalika mata mandir crowd

Navratri 2022 : कालिकामातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नाशिक : पावसाने उघडीप दिल्याने नाशिकचे ग्रामदैवत कालिकामातेच्या दर्शनासाठी तिसऱ्या माळेला भाविकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नवरात्रोत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेलादेखील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Navratri 2022 Devotees crowd at Kalika Mata Mandir Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: खाद्यतेलाच्या दरात मोठी घसरण; सीमा शुल्क रद्द केल्याचा परिणाम

मंगळवारी (ता.२७) शहरात सायंकाळी बरसलेल्या पावसाच्या सरीमुळे कालिका देवी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दीत घट झाली होती. त्यानंतर बुधवारी (ता.२८) पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. या वेळी माजी आमदार जयंत जाधव यांच्या हस्ते सकाळी देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळपासूनच दर्शनासाठी भाविक येत होते.

या वेळी सायंकाळी भाविकांकडून दर्शनासह येथे भरलेल्या जत्रेत असलेल्या गृह सजावटीचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने साहित्य, दागिणे, कपडे, खाद्यपदार्थांच्या दुकानांवर महिलांसह, तरुणी आणि इतर नागरिक गर्दी करत आहे. याबरोबरच परिसरातील मोकळ्‌या मैदानात उभारण्यात आलेल्या रहाट पाळणे आदी ठिकाणीदेखील मोठ्या संख्येने नागरिक भेट देत आहे.

हेही वाचा: 5 वर्षानंतर प्रथेनूसार गडावर होणार बोकड बळी विधी; न्यायालयाने बंदी उठवली