Navratri 2023: गरबा, दांडियावर CCTVचा ‘वॉच’! नाशिकमध्ये शहरात 200 मंडळांना सशर्त परवानगी

Garba Dandiya
Garba Dandiyaesakal

Navratri 2023 : शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून बंदोबस्ताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी गर्दी होत असते.

त्यामुळे अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलिसांनी गरबा व दांडियाचे आयोजन करणाऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक केले आहे.

दरम्यान, आयुक्तालय हद्दीमध्ये लहान-मोठ्या सुमारे दोनश-सव्वादोनशे मंडळांनी आयुक्तालयाकडून परवानगी घेतली आहे. (Navratri 2023 CCTV police watch on Garba Dandiya Conditional permission for 200 mandals in city in Nashik)

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला आज प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शहराचे ग्रामदैवत कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. येत्या नऊ दिवसात शहरातील देवी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी राहील.

तर, सायंकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत दांडिया व गरबा खेळण्यासाठी तरुणाईची गर्दी राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, त्यासाठी आयोजकांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक केले असून तशा सूचना पोलिसांनी संबंधितांना दिले आहेत.

तसेच, पोलिसांच्या गस्ती पथकांकडूनही संबंधित ठिकाणी नियमित गस्त केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, गरबा व दांडियाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकाराचा डीजे वा लेझरचा वापर करण्यास मनाई केली असून तसे आढळून आल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

आयुक्तालय हद्दीमध्ये सुमारे दोनशे ते सव्वा दोनशे मंडळांनी देवीची घटस्थापना केली असून, त्यासाठी आयुक्तालयाकडून रीतसर परवानगी घेतली आहे.

Garba Dandiya
Navratri Festival 2023 : गजर जय अंबे जगदंबेचा; नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांचा जागर

कडेकोट पोलीस बंदोबस्त

शहरात कालिका देवी यात्रोत्सव व भगूर येथे रेणुका माता देवी दर्शनासाठी भाविकांची दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. तसेच, दररोज दर्शनासाठी भाविक महिला पायी मंदिरात येतात.

ही संधी साधून चैनस्नॅचर्सकडून महिलांचे दागिने लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कालिकादेवी मंदिर व रेणुका देवी मंदिरासह शहरातील देवी मंदिर मंदिरात पोलीस व होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला आहे.

याशिवाय निर्भया व दामिनी पथकांचीही सज्जता ठेवण्यात आलेली आहे. तसेच, कालिका मंदिर परिसरात पोलिसांचे नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेले आहे.

या कक्षातून भाविकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या जाणार आहे. गर्दीमध्ये महिला, लहान मुलांचे दागिने, पुरुषांचे पाकीट चोरणाऱ्यांची शक्यता गृहीत धरून साध्या वेशातील पोलिसांची गस्ती गर्दीमध्ये राहणार आहे.

Garba Dandiya
Navratri 2023 : नवरात्रीला आवर्जून करा हे खास उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com