esakal | चंद्रकांत पाटीलांच्या 'त्या' वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

बोलून बातमी शोधा

chandrakant patil and ncp
चंद्रकांत पाटीलांच्या 'त्या' वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर (west bangal election 2021) पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी ‘तुम्ही जामिनावर आहात हे लक्षात ठेवा,’ अशी टिप्पणी केली. पाटील यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) निषेध नोंदविला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

पाटील यांचे वक्तव्य देशातील न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करणारे असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली. ठाकरे म्हणाले, की पाच राज्यांच्या निवडणुकीत आसाम वगळता भाजपला जनतेने नाकारले असताना पराभव जिव्हारी लागल्याने पाटील यांनी भुजबळ यांच्यावर बेतालपणे वक्तव्य करून उघड धमकी देण्याचा प्रकार आहे. लोकशाही व्यवस्थेला हा प्रकार घातक आहे. ज्यांना जनतेने सपशेलपणे नाकारले असताना त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार शिल्लक राहत नाही.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍युकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

रंजन ठाकरे : न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करणारे वक्तव्य

भुजबळ यांनी न्यायव्यवस्थेचा नेहमी आदर केला. आपला न्यायालयीन लढा कायदेशीररीत्या लढत आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा श्री. पाटील यांना कुठलाही अधिकार नाही. तरीसुद्धा हुकूमशाही पद्धतीने न्यायव्यवस्था आपल्या खिशात असल्यासारखे त्यांचे वागणे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. याआधी देशातील जनतेने सीबीआय, ईडी यासह सरकारी यंत्रणांचा राजकीय फायद्यापोटी वापर करताना बघितले आहे. सीबीआय, ईडीचा राजकीय वापर केला जातोय का? न्यायदेवता त्यांच्या हातात आहे काय, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाल्याने या हुकूमशाही वृत्तीला जनतेने नाकारण्यास सुरवात केली आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: "पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला