Sharad Pawar

Sharad Pawar

sakal 

Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे रणशिंग: स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षाचे शिबिर

Sharad Pawar to deliver valedictory speech : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिर रविवारी नाशिकमध्ये होणार आहे.
Published on

नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिर रविवारी (ता. १४) नाशिकमध्ये होणार आहे. या शिबिरात राज्यभरातील सुमारे ७०० पदाधिकारी सहभागी होणार असून, विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. त्यानंतर सोमवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रोश मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com