esakal | गॅसदरवाढीचा संताप! राष्ट्रवादीच्या महिलांकडुन मोदी सरकारला शेणाच्या गोवऱ्या भेट
sakal

बोलून बातमी शोधा

NCP women send dung to Modi government on gas price hike

राष्ट्रवादीच्या महिलांकडुन मोदी सरकारला शेणाच्या गोवऱ्या भेट

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : दिवसेंदिवस पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना शेणाच्या गोवऱ्या पोस्टाने भेट पाठवून महिला पदाधिकारींनी थाळीनाद करत आपला संताप व्यक्त केला.

केंद्रातील निष्काळजी आणि निष्क्रिय अशा मोदी सरकारमुळे आज सामान्य जनतेचं जगणं अवघड झालं आहे. याचा संताप करत आज नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात महिलानी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून थाळीनाद करत केंद्र सरकारचा निषेध केला.

महिलांचे किचन बजेट कोलमडले

१ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल रूपये १९० ची दरवाढ करण्यात आली असून, अनुदान मात्र बंद करण्यात आले आहे. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत येण्याआधी १ मार्च २०१४ रोजी मिळणारे गॅस सिलेंडर रूपये ४१० किमतीचे आज रूपये ९०० पर्यंत जाऊन पोहोचले. यामुळे सर्व सामान्य महिलांचे किचन बजेट संपूर्ण पणे कोलमडले आहे. महिलांनी वारंवार आंदोलन करूनही केंद्रातील सरकार मात्र ढिम्म बसून गंमत पाहतांना दिसते.

हेही वाचा: नाशिककरांनो काळजी घ्या! रुग्णसंख्या फक्त 100 ने कमी - भुजबळ

दरवाढीचा आलेख वाढताच

गेल्या दिड वर्षापासून देशात कोरोना रोगामुळे (Corona) अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेकांचे रोजगार बुडाले अशा कठीण परिस्थितीत महागाई वाढत असल्याने सामान्य माणसाला जीवन जगणे नकोसे झाले आहे. देशातील गोरगरिब विरोधी सरकार जाणिवपूर्वक महागाईला आळा घालण्या ऐवेजी बढावा देत आहे. हे सरकार देश चालवायला कुचकामी ठरत आहे. दररोज दरवाढीचा आलेख वाढत आहे. आज नऊशे रुपयांवर नेऊन ठेवला असुन महिलांना घर चालवणे अधिक कठिण बनले आहे. गॅस सिलेंडरची दरवाढ असह्य होत असल्याने केद्रांतील भाजप सरकारचा निषेध करीत आज पोस्टात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना शेणाच्या गोवऱ्या पार्सल म्हणून भेट पाठवल्या. या विरोधी धोरणा विरोधात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: इंपिरिकल डाटा तयार करण्यास सर्वपक्षीयांचा होकार - भुजबळ

या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, भगूर शहराध्यक्षा प्रेमलता राजगुरू, ज्योती भोर, रुबीना खान, संगिता उमाप, सपना पवार, गायत्री झांजरे, लता आहिरे, दिपाली गायकवाड, मेहरुनिसा खान, आदींसह महिला उपस्थित होत्या.

loading image
go to top