NDVS Bank Election: न्यायालयाच्या आदेशानुसार 56 उमेदवारांचे अर्ज बाद; अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस

NDVS Bank Election
NDVS Bank Electionesakal

NDVS Bank Election : नाशिक रोड- देवळाली व्यापारी सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ११ जूनला होणार असून या निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोचलेली असतानाच न्यायालयाच्या आदेशानुसार सुमारे ५६ इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद झाले.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी (ता. १) शेवटचा दिवस असून किती उमेदवार अर्ज मागे घेतात व किती रिंगणात राहतात याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. (NDVS Bank Election Applications of 56 candidates rejected court order today last day for application withdrawal nashik news)

निवडणूक होण्यापूर्वी बँकेच्या सर्वसाधारण सभेत एक ठराव मंजूर झाला होता. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या दोन वर्ष अगोदर बँकेत सर्वसाधारण गटासाठी दोन लाख रुपयांच्या ठेवी व वीस हजार रुपयांचे शेअर्स तर इतर मागासवर्ग गटासह व इतर गटांसाठी एक लाख रुपयांच्या ठेवी आणि दहा हजार रुपयांचे शेअर्स घेण्याचे बंधनकारक केले होते.

या सर्वसाधारण सभेच्या प्रस्तावाला सहकार आयुक्तांनीदेखील मंजुरी दिली होती. परंतु या निर्णयाविरोधात सध्याचे परिवर्तन पॅनलचे नेते हेमंत गायकवाड, अशोक सातभाई, चंद्रकांत विसपुते यांनी सहकार मंत्र्याकडे धाव घेऊन पोटनियम क्रमांक ४० मध्ये दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती त्यानुसार सहकार मंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली होती.

दरम्यान सहकार मंत्र्यांच्या निर्णयाविरोधात सहकार पॅनलचे नेते निवृत्ती अरिंगळे व सुनील चोपडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत न्यायालयाने नुकताच निकाल देऊन यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांना शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे जिल्हा उपनिबंधक आणि शासनाच्या आदेशानुसार प्रक्रिया राबविले व त्यात सुमारे ५६ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविले. सध्या सहकार व परिवर्तन, असे दोन पॅनल रिंगणात राहण्याची शक्यता आहे. सहकारचे नेतृत्व दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, तर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व अशोक सातभाई, हेमंत गायकवाड, चंद्रकांत विसपुते हे करत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NDVS Bank Election
ZP Cess Fund : जि.प. सेसमधून प्रशासकीय खर्चावर भर; प्रशासकीय राजवटीत ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष

यांचे अर्ज झाले बाद

ज्या ५६ इच्छुक उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे, त्यामध्ये प्रामुख्याने हेमंत गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, प्रसाद आडके, संगीता गायकवाड, जगदीश गोडसे, श्याम गोहाड, विश्वास चौगुले, राजू चौधरी, बाळकृष्ण दणदणे, राजेंद्र दुसाने, योगेश निसाळ, प्रकाश पाळदे,

भाईजान बाटलीवाला, राजेंद्र बोथरा, केशव बोराडे, जयप्रकाश भट्टड, संतोषकुमार मंडलेचा, अशोक म्हस्के, राहुल राठी, आशिष हगवणे, गणेश कदम, विजय जाधव, सुनील महाले या उमेदवारांचा सर्वसाधारण गटातून उमेदवारी अर्ज नामंजूर झाला आहे.

त्याचप्रमाणे महिला राखीव गटातून मनीषा आडके, संगीता गायकवाड, सविता तुंगार, लक्ष्मी ताठे, सुप्रिया कदम, इतर मागासवर्ग गटातून विश्वास चौगुले, योगेश निसाळ, अशोक म्हस्के, हेमंत शिंदे,

विमुक्त जाती भटक्या जमाती या गटातून चंद्रभान घुगे, विष्णू घुगे, गणेश चाफळकर, संतोष चाफळकर, लतीफ शेख तसेच अनुसूचित जाती जमाती या गटातून शरद उबाळे, अरुण गिरजे, सुषमा पगारे, रविकिरण घोलप, लक्ष्मण ढकोलीया, संतोष साळवे, मंगेश सोनवणे यांचे अर्ज नामंजूर झाले आहे.

NDVS Bank Election
Nashik Police Commissionerate: पोलिस आयुक्तालयास प्रतिक्षा नवीन अधिकाऱ्यांची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com