NDVS Bank Election : सामान्य शेअर होल्डरलाही लढविता येणार व्यापारी बँकेची निवडणूक!

पोटनियम ४० ला सहकार मंत्री अतुल सावे यांची स्थगिती
NDVS Bank Election
NDVS Bank Electionesakal

NDVS Bank Election : नाशिक रोड- देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक येणाऱ्या महिनाभरात जाहीर होणार आहे. मात्र त्याआधी राजकारण रंगायला सुरवात झाली आहे. १३ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या पोटनियम क्रमांक ४० ला सभासद व माजी संचालकांच्या अर्जावरून सहकार मंत्री अतुल सावे यांनी स्थगिती दिली आहे.

यामुळे सामान्य शेअर होल्डरला निवडणूक लढविण्यासाठी नवी संधी निर्माण होणार आहे. (NDVS Bank Election Common shareholder can also contest election of merchant bank nashik news)

व्यापारी बँकेचा संचालक होण्यासाठी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी पोटनियम क्रमांक ४० केला होता. त्याअंतर्गत संचालक होण्यासाठी पात्रता किमान भागभांडवल वीस हजार रुपये आणि किमान ठेव दोन लाख रुपये ही संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर धारण केलेली असावी, असा पोटनियम ४० होता.

शिवाय संचालक पदावर निवडून आल्यावर शेअर व डिपॉझिट हे पाच वर्षे सलग ठेवावे लागेल असे नमूद होते. या नियमाला बँकेचे माजी संचालक हेमंत गायकवाड व चंद्रकांत विसपुते यांनी सहकार मंत्र्यांच्या दालनात अर्ज करून हरकत घेतली.

या हरकतींची सुनावणी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या दालनात झाली. अर्जदार व सहकार आयुक्त व्यापारी बँकेची बाजू सहकार मंत्र्यांनी ऐकून घेतली. त्या अंतर्गत कोरोनाकाळाचा विचार करता पोटनियमाला सहकार मंत्री अतुल सावे यांनी स्थगिती दिली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

NDVS Bank Election
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election : नाशिक बाजार समितीची निवडणूक, शेतकऱ्यांना नेमकं काय हवं?

व्यापारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना सामान्य शेअर होल्डर दोन लाख रुपये डिपॉझिट व वीस हजार रुपयांचे शेअर घेऊन निवडणूक लढवू शकणार आहे. यामुळे सामान्य शेअर होल्डरला निवडणूक लढविण्यासाठी या पोटनियमामधील स्थगितीमुळे नव्या संधी निर्माण होणार आहे.

"सामान्य भागभांडवल धारकांना या स्थगितीमुळे निवडणूक लढविणे सोयीचे होणार आहे. बँकेच्या संदर्भात अधिक खुलासे आम्ही येत्या आठ दिवसात माध्यमांसमोर करणार आहोत."

- अशोक सातभाई, संचालक

"हा पोटनियम आम्ही सभासदांच्या मागणीनुसार तयार केला होता. भागभांडवल आणि नफा वाढवा हा त्यामागचा उद्देश होता. अर्जदारांनी आम्हाला सांगितले असते तर जनरल मीटिंगमध्ये हा ठराव आम्ही बदलून घेतला असता." - निवृत्ती अरिंगळे, अध्यक्ष, व्यापारी बँक.

"सामान्य शेअर होल्डर ला निवडणूक लढविता यावी यासाठी आम्ही सामान्य शेअर होल्डरच्या बाजूने अर्ज दाखल केला होता. या पोटनियमातील स्थगितीमुळे व्यापारी बँकेच्या सहकार क्षेत्रातील लोकशाही बळकट होऊन बँकेचे शेअर होल्डर येणाऱ्या काळात परिवर्तन घडवतील."

- हेमंत गायकवाड, अर्जदार

NDVS Bank Election
Malegaon Market Committee Election : मालेगावला उत्साह अन् शांततेत मतदान; मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com